![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
GT vs RR: अखेरच्या षटकात मिलरनं कसा फिरवला सामना? व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा
IPL 2022 Qualifier 1: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या क्वालीफायर सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा (Gujarat Titans vs Rajasthan Royals) सात विकेट्सनं पराभव केला.
![GT vs RR: अखेरच्या षटकात मिलरनं कसा फिरवला सामना? व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा GT vs RR: Gujarat Titans' David Miller takes GT into IPL 2022 final with last-over win vs Rajasthan Royals GT vs RR: अखेरच्या षटकात मिलरनं कसा फिरवला सामना? व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/24/801f02cc5e29eeeefbab00200acab6cf_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL 2022 Qualifier 1: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील पहिल्या क्वालीफायर सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा (Gujarat Titans vs Rajasthan Royals) सात विकेट्सनं पराभव केला. या विजयासह गुजरातच्या संघानं आयपीएल 2022 च्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. गुजरातच्या विजयात डेव्हिड मिलरनं (David Miller) महत्वाची भूमिका बजावली. या सामन्यात मिलरनं 38 चेंडूत 68 धावांची वादळी खेळी केली. दरम्यान, अखेरच्या षटकात गुजरातच्या संघाला 16 धावांची गरज असताना मिलर कसा सामना फिरवला आणि गुजरातला विजय मिळवून दिला? यावर एक नजर टाकुयात.
दरम्यान, राजस्थाननं दिलेल्या 189 लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाला अखेरच्या षटकात 16 धावांची गरज होती. त्यावेळी डेव्हिड मिलर क्रिजवर होता आणि संजू सॅमसननं चेंडू प्रसिद्ध कृष्णाच्या हाती सोपवला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर डेव्हिड मिलरनं षटकार मारून सामना गुजरातच्या दिशनं झुकवला. गुजरातला आता जिंकण्यासाठी पाच चेंडूत 10 धावांची गरज होती. परंतु, दुसऱ्या चेंडूतही षटकार मारून डेव्हिड मिलरनं सामन्यावर पूर्णपणे कब्जा केला. आता गुजरातला विजयासाठी चार चेंडूत फक्त चार धावा करायच्या होत्या. या षटकातील तिसरा चेंडू देखील डेव्हिड मिलरनं प्रेक्षकांपर्यंत पोहचवत गुजरातला विजय मिळवून दिला. डेव्हिड मिलरनं सलग तीन चेंडूत तीन षटकार मारून गुजरातच्या संघाला अंतिम फेरीत पोहचवलं.
व्हिडिओ-
गुजरातचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय
दरम्यान, क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात गुजरातच्या संघानं नाणेफेकू जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात सहा विकेट्स गमावून गुजरातसमोर 189 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात डेव्हिड मिलरची वादळी खेळी आणि कर्णधार हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या जोरावर गुजरातनं सात विकेट्स राखून राजस्थानला पराभूत केलं.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)