एक्स्प्लोर

GT vs RR : मिलरचं अर्धशतक, गुजरातची फायनलमध्ये धडक, राजस्थानवर सात विकेटने विजय

GT vs RR, IPL 2022 : डेविड मिलरचं वादळी अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या बळावर गुजरातने राजस्थानचा सात विकेट आणि तीन चेंडू राखून पराभव केला.

GT vs RR, IPL 2022 : डेविड मिलरचं वादळी अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या बळावर गुजरातने राजस्थानचा सात विकेट आणि तीन चेंडू राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली. तर राजस्थानचा संघ क्लालिफायर 2 मध्ये खेळणार आहे. 25 मे रोजी होणाऱ्या लखनौ आणि आरसीबी यांच्यातील विजेत्यासोबत क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानचा संघ भिडणार आहे. दरम्यान, मोक्याच्या क्षणी मिलरने नाबाद 68 तर हार्दिक पांड्याने नाबाद 40 धावांची खेळी केली.  

189 धावांचा पाठलाग करताना गुजरातचीही सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असणारा वृद्धीमान साहा शून्यावर बाद झाला. बोल्टने त्याला बाद केले.. त्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी गुजरातचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी गिल-मॅथ्यू वेड यांनी 71 धावांची भागिदारी करत पाया रचला.. पण गिल आणि मॅथ्यू वेड एकापाठोपाठ एक बाद झाले.. गुजरातचा डाव कोसळणार असे वाटत असतानाच कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेविड मिलर धावून आले. दोघांनी गुजरातला विजय मिळवून दिला. मिलर आणि हार्दिक पांड्या यांनी 61 चेंडूत 106 धावांची मॅचविनिंग भागिदारी केली. दरम्यान, राजस्थानकडून ट्रेंट बोल्ट आणि मकॉय यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. तर यजुवेंद्र चाहल आणि आर अश्विन यांची पाटी कोरी राहिली..

शुभमन गिल-मॅथ्यू वेडने रचला पाया - 
दुसऱ्याच चेंडूवर विकेट पडल्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेड यांनी गुजरातचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 71 धावांची भागिदारी केली. शुभमन गिलने 21 चेंडूत 35 धावांची खेळी केली. तर मॅथ्यू वेडने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली. दोघांनी एकेरी आणि दुहेरी धावसंख्येवर भर देतानाच चौकारांचा पाऊस पाडला.. दोघांनी 11 चौकार आणि एका षटकाराचा पाऊस पाडला.. गिल आणि वेड यांनी गुजरातच्या विजयाचा पाया रचला. 

हार्दिक पांड्या-डेविड मिलरने कळस चढवला-
गिल आणि वेड यांनी पाया रचल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेविड मिलर यांनी कळस चढवला. हार्दिक पांड्या आणि मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी 61 चेंडूत 106 धावांची भागिदारी केली. मिलरने 38 चेंडूत 68 धावांची खेळी केली.. या खेळीदरम्यान मिलरने पाच षटकार आणि तीन चौकार लगावले..तर हार्दिक पांड्याने पाच चौकारांच्या मदतीने नाबाद 40 धावांची खेळी केली. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी 16 धावांची गरज होती.. त्यावेळी डेविड मिलरने प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार लगावत सामना संपवला.

राजस्थानची 188 धावांपर्यंत मजल - 
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून राजस्थान संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. यश दयालने तीन धावांवर यशस्वी जायस्वालला माघारी धाडले... त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने फटकेबाजी सुरु केली.. जोस बटलर संथ फलंदाजी करत होता... संजू सॅमससने 26 चेंडूत 47 धावांची खेळी केली. संजू आणि बटलर यांनी राज्थानचा डाव सावरला. दोघांनी 47 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. संजूने तीन षटकार आणि पाच चौकारांसह 47 धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कलने 20 चेंडूत 28 धावांची खेळी केली.  पडिकल आणि बटलर यांच्यात 26 चेंडूत 37 धावांची भागिदारी झाली... त्यानंतर अखेरच्या षटकात बटलरने हेटमायरच्या मदतीने चौथ्या विकेटसाठी 26 चेंडूत 45 धावांची भागिदारी केली.  हेटमायर चार धावा काढून बाद झाला.. जोस बटलर 89 धावा काढून धावबाद झाला..रियान पराग चार धावा काढून धावबाद झाला. जोस बटलरच्या 89 धावांच्या बळावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या.

बटलरची अर्धशतकी खेळी - 
यंदाच्या हंगामात तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या जोस बटलरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. गुजरातच्या भेदक माऱ्यापुढे बटलरची बॅट शांत होती. बटलरने 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जोस बटलर 31 चेंडूत 30 धावांवर खेळत होता.. त्यानंतर अखेरच्या षटकात बटलरने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. बटलरने अर्धशतक करेपर्यंत एकही षटकार लगावला नाही... अखेरच्या तीन षटकांमध्ये जोस बटलरने धावांचा पाऊस पाडला.. चौकार आणि षटकारांनी खोऱ्याने धावा वसूल केल्या... जोस बटलरला गुजरातच्या खेळाडूंनी जिवदान दिले..त्याचा फायदा बटलरने उचलला.. जोस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान बटलरने 12 चौकार आणि दोन षटकार लगावले. 

गुजरातच्या गोलंदाजांनी लय गमावली - 
गुजरातच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला.. पण नंतर राजस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. गुजरातकडून हार्दिक पांड्या, मोहम्मद शामी, यश दयाल आणि आर साईकिशोर यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. मोहम्मद शामी, यश दयाल, अल्झारी जोसेफआणि आर साईकिशोर महागडे ठरले.. या गोलंदाजांना प्रतिषटक 10 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. 

राशिदचा भेदक मारा - 
राशिद खानने भेदक मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. राशिद खानला आजच्या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही.. पण राजस्थानच्या फलंदाजांना धावाही काढता आल्या नाहीत. राशिद खानने चार षटकात 15 धावा दिल्या.. 

पावसामुळे खेळपट्टी संथ - 
मागील दोन दिवसांपासून कोलकात्यामध्ये पाऊस पडत आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल महत्वाचा होता.. पावसामुळे खेळपट्टी संथ झाली होती..त्यामुळे बॅटवर चेंडू व्यवस्थित येत नव्हता.. त्यामुळे जोस बटलरसारखा विस्फोटक फलंदाजानेही सुरुवातीला संथ फलंदाजी केली. गुजरातच्या फलंदाजांनीही एकेरी-दुहेरी धावसंख्येवर भर दिला..

संजू सॅमसनने पुन्हा नाणेफेक गमावली -
संजू सॅमसनने आज पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. यंदाच्या हंगामात सर्वाधिकवेळा नाणेफेक गमावण्याचा नकोसा विक्रम संजूच्या नावावर जमा झालाय.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनंSatej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारीEknath Shinde Koregaon Sabha : महेश शिंदेंच्या प्रचारसाठी कोरेगावात सभा, शिंदेंची कोरेगावात सभाSharad Pawar On Retirement : 14 वेळा निवडणुका लढल्या, आता निवडणुक लढणार नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil Radhanagari Speech :   भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
भर मंचावर सतेज पाटलांना समोर बोलावलं, राधानगरीत मोठी जबाबदारी
Uddhav Thackeray: कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची पाच मोठी गेमचेंजर आश्वासनं; मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घरं ते स्थिर भाव
मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
Dhule Cash Seized : मध्यप्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या वाहनातून 70 लाखांची रोकड जप्त
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
एकाच राज्यासाठी काम करत असाल तर तुम्ही पंतप्रधान कशाला होता? राज्याचे मुख्यमंत्री व्हा; पवार गरजले
Numerology : अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; मनातील भावनाही धड करत नाहीत व्यक्त, लोक काय बोलतील याचा करतात अति विचार
अतिशय घाबरट असतात 'या' जन्मतारखेचे लोक; लोक काय बोलतील याचा करतात अति विचार, मनातील भावना व्यक्त करायलाही घाबरतात
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Embed widget