GT vs RR Live Updates : मिलरचं वादळी अर्धशतक, हार्दिकची फटकेबाजी, गुजरातचा राजस्थानवर विजय
GT vs RR Live Updates : कोलकात्याच्या ईडन गार्डनवर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ लढणार, कोण मारणार बाजी?
LIVE
Background
GT vs RR Live Updates, IPL 2022 Qualifier 1 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल यांच्यात आज क्लालिफायर 1 चा सामना रंगणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवर गुणतालिकेतील अव्वल दोन संघ लढणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये पोहचणार आहे. तर पराभूत संघाला क्लाविफायर 2 खेळण्याची संधी मिळणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात गुजरातने आतापर्यंत दमदार कामगिरी केली... त्यामुळे गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने सांघिक खेळणाच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश केला... राजस्थान संघाचीही कामगिरी दणक्यात झाली आहे.
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात पार पडणार आहे. राजस्थान रॉयल्सचा रेकॉर्ड या मैदानावर खास नसून त्यांनी या ठिकाणी खेळलेल्या 9 सामन्यांतील केवळ 2 सामने जिंकले आहेत. त्यात मागील 5 सामन्यातील 3 सामने हे चेस करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. त्यात सामनाही सायंकाळी आहे अशामध्ये दवाची अडचणही येऊ शकते. ज्यामुळे नाणेफेक जिंकून संघ गोलंदाजी आधी घेण्याची अधिक शक्यता आहे.
गुजरात-राजस्थानची साखळी सामन्यांत दमदार कामगिरी
गुजरात टायटन्स संघ यंदाच्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा सर्वात पहिला संघ आहे. त्यांनी लीग स्टेजमध्ये 14 सामन्यांतील 10 सामने जिंकले, ज्यामुळे त्यांच्या नावावर सर्वाधिक 20 गुण आहेत. ज्यामुळे ते गुणतालिकेही टॉपवर आहेत. संघाकडून सर्वच खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. त्यात कर्णधार हार्दिक पांड्या पुन्हा फॉर्ममध्ये आल्याचा संघाला बराच फायदा झाला. याशिवाय आयपीएलच्या साखळी सामन्यात राजस्थाननं ही दमदार प्रदर्शन केलं. दरम्यान, राजस्थाननं 14 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून 18 गुणांसह प्लेऑफमध्ये धडक दिली. या हंगामात राजस्थानला पाच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानसाठी जोस बटलरनं आक्रमक फलंदाजी केली. तसेच ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो अव्वल स्थानी आहे. याशिवाय, युजवेंद्र चहलनंही चांगल्या कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पर्पल कॅपच्या शर्यतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे.
गुजरातची फायनलमध्ये धडक
डेविड मिलरचं वादळी अर्धशतक आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाजीच्या बळावर गुजरातने राजस्थानचा सात विकेट आणि तीन चेंडू राखून पराभव केला. या विजयासह गुजरातने आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या फायनलमध्ये धडक मारली. तर राजस्थानचा संघ क्लालिफायर 2 मध्ये खेळणार आहे. 25 मे रोजी होणाऱ्या लखनौ आणि आरसीबी यांच्यातील विजेत्यासोबत क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानचा संघ भिडणार आहे. दरम्यान, मोक्याच्या क्षणी मिलरने नाबाद 68 तर हार्दिक पांड्याने नाबाद 40 धावांची खेळी केली.
मिलरचं वादळी अर्धशतक, हार्दिकची फटकेबाजी, गुजरातचा राजस्थानवर विजय
डेविड मिलरच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने राजस्थानचा सात विकेटने पराभव केला. सहा चेंडूत 16 धावांची गरज असताना डेविड मिलरने पहिल्या तीन चेंडूवर तीन षटकार मारत विजय मिळवला.. मिलरने नाबाद 68 धावांची खेळी केली.
डेविड मिलरची अर्धशतकी खेळी
डेविड मिलरने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी केली. मिलरने 35 चेंडूत 50 धावांची खेळी केली.
हार्दिक पांड्या-डेविड मिलरची जोडी जमली
कर्णधार हार्दिक पांड्या आणि डेविड मिलर यांनी गुजरातचा डाव सावरलाय.. पांड्या 35 तर मिलर 28 धावांवर खेळत आहे. गुजरातला विजयासाठी 24 चेंडूत 43 धावांची गरज आहे.
गुजरातला तिसरा धक्का, मॅथ्यू वेड बाद
मॅथ्यू वेड 35 धावांवर बाद झाल्यामुळे गुजरातला तिसरा धक्का बसला आहे.