GT vs MI : रोहित-ईशानची फटकेबाजी, टीम डेविडचा फिनिशिंग टच, मुंबईची 177 धावांपर्यंत मजल
GT vs MI, IPL 2022 : कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची वादळी सुरुवात त्यानंतर टीम डेविडच्या फिनिशिंग टचच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या आहेत.
GT vs MI, IPL 2022 : कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची वादळी सुरुवात त्यानंतर टीम डेविडच्या फिनिशिंग टचच्या जोरावर मुंबईने निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 177 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 43,ईशान किशन 45 आणि टीम डेविड 44 धावांची खेळी केली. गुजरातला विजयासाठी 178 धावांचे आव्हान देण्यात आलेय.
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या आयपीएलमध्ये फ्लॉग गेलेल्या रोहित शर्माने गुजरातविरोधात तुफान फटकेबाजी केली. रोहित शर्माने सुरुवातीपासूनच धावांचा पाऊस पाडला. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी सहा षटकार 61 धावा चोपल्या. रोहित शर्माने 29 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान रोहित शर्माने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी 74 धावांची सलामी दिली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवला मोठी खेळी करण्यात अपयश आले. सूर्यकुमार यादव अवघ्या 13 धावा काढून माघारी परतला. सूर्यकुमार यादवनंतर ईशान किशनही बाद झाला. ईशान किशन याने 29 चेंडूत 45 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान ईशान किशन याने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. अष्टपैलू कायरन पोलार्डला आज पुन्हा एकदा अपयश आले. पोलार्डला 014 चेंडूत फक्त चार धावा काढता आल्या. तिलक वर्मा 21 धावांवर धावबाद झाला. अखेरच्या दोन षटकार टीम डेविडने विस्फोटक फलंदाजी करत मुंबईची धावसंख्या वाढवली. टीम डेविडने 21 चेंडूत 44 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान डेविडने चार षटकार आणि दोन चौकार लगावले. सॅम्सला एकही धाव काढता आली नाही. तो स्वस्तात बाद झाला.
गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय अल्झारी जोसेफ, लॉकी फर्गुसन, प्रदीप सांगवान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
मुंबईच्या संघात एक बदल -
गुजरातच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. मागील सामन्यातील संघ कायम ठेवण्यात आलाय. तर मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आलाय. मुंबईने ह्रतिक शौकीनच्या जागी एम. अश्विनला स्थान दिलेय.. मुंबईच्या संघात आजही अर्जुन तेंडुलकरला स्थान दिले नाही.
मुंबईचा संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कायरन पोलार्ड, टिम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, मुरुगन अश्विन, कुमार कार्तिकेय, जसप्रीत बुमराह, रायली मेरेडेथ
गुजरातचा संघ -
ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या(कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवातिया, राशीद खान, प्रदीप सांगवान, लॉकी फर्ग्यूसन, अलजारी जोसेफ, मोहम्मद शमी