GT vs CSK : चेन्नई सलामी सामन्यातील पराभवाचा वचपा काढणार की पांड्या पुन्हा बाजी मारणार? चेन्नई विरुद्ध गुजरात अजिंक्य
CSK vs GT Qualifier 1 : आयपीएल 2023 मधील पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई आणि गुजरात संघ आमने-सामने येणार आहेत.
IPL 2023 Qualifier 1 : आयपीएलच्या यंदाच्या सोळाव्या हंगामातील पहिला सामना आज, 23 मे रोजी गतविजेता गुजरात टायटन्स (GT) आणि चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात रंगणार आहे. यंदाच्या मोसमाची सुरुवातही या दोन संघाच्या लढतीने झाली होती. आयपीएल 2023 मधील पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्स संघाने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. विशेष म्हणजे चेन्नई विरुद्ध गुजरात अजिंक्य आहे. आतापर्यंत इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नईला गुजरातविरोधातील एकही सामना जिंकता आलेला नाही.
चेन्नई पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढणार?
आयपीएल 2023 मधील पहिल्या क्वालिफायरमध्ये आज धोनीचा चेन्नई संघ आणि पांड्याचा संघ मैदानात आमने-सामने असतील. इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई आणि गुजरात हे दोन संघ तीन वेळा रणांगणात उतरले आहेत. यामध्ये गुजरात संघाचं पारड जड आहे. गुजरात संघांने चेन्नई विरोधातील सर्व तीन सामने जिंकले आहेत. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढून अंतिम फेरीत प्रवेश करण्याची संधी चेन्नई संघाला आज मिळणार आहे. गुजरात चेन्नईवर पुन्हा एकदा मात करतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
सलामी सामन्यात गुजरातची चेन्नईवर मात
आयपीएल 2023 च्या साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी जवळपास सारखीच आहे. पण यंदाच्या मोसमातही एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील गुजरातने चेन्नई सुपर किंग्सला मागे टाकलं आहे. आयपीएल 2023 चा सलामीचा सामना गुजरात आणि चेन्नई यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने चेन्नई सुपर किंग्स संघाचा पाच गडी राखून पराभव केला. याशिवाय आयपीएलच्या इतिहासात गुजरात आणि चेन्नई यांच्यात एकूण 3 सामने खेळले गेले आहेत. हे तिन्ही सामने गुजरातने जिंकले आहेत.
GT vs RCB, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गतविजेता गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात 21 मे रोजी रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. हा सामना चेन्नईमधील चेपॉक मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमवर (MA Chidambaram Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.