Yuvraj Singh : 'ठंड रख...', कोहली-गंभीर वादात युवराजची उडी; ट्वीट करत म्हणाला...
Virat Kohli and Gautam Gambhir Fight : विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादावर आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने प्रतिक्रिया दिली आहे.
Yuvraj Singh on Kohli and Gambhir : सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये आता युवराज सिंहने उडी घेतली आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादावर आता माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने याबाबत ट्वीट केलं आहे. या ट्वीटनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यावर युवीचं मजेशीर ट्विट व्हायरल होत आहे. याबद्दल सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत.
कोहली आणि गंभीर वादावर 'युवी'ची प्रतिक्रिया
विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादावर माजी क्रिकेटपटू आणि चाहते सातत्याने सोशल मीडियावर प्रतिक्रिया शेअर करताना दिसत आहेत. तर, अनेक माजी खेळाडूंचं म्हणणं आहे की, विराट कोहली आणि गौतम गंभीर या दोघांनी एकत्र बसून हे भांडण मिटवायला हवं. दरम्यान, याबाबत युवराज सिंहने मजेदार ट्विट करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
युवराज सिंहचं मजेदार ट्वीट व्हायरल
युवराज सिंहने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्याती शाब्दिक चकमकीवर मजेदार ट्वीट करत त्याची प्रतिक्रिया दिली आहे. युवराजने ट्वीट करत म्हटलं आहे की, 'स्पाईट कंपनीने त्यांच्या 'थंड राहा' या उपक्रमासाठी विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यासोबत करार करायला हवा. काय सांगता?'
नक्की काय म्हणाला, युवी?
I think #Sprite should sign #Gauti and #Cheeku for their campaign #ThandRakh 🤪🥶 what say guys? 😎 @GautamGambhir @imVkohli @Sprite
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) May 4, 2023
10 वर्ष जुना वाद
इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासात 10 वर्षानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात पुन्हा एकदा मैदानावर भांडण पाहायला मिळाले. 2013 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा कर्णधार विराट कोहली यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान कोहली आणि गंभीर यांच्यात पहिल्यांदा वाद झाला होता. 10 वर्षांनंतर लखनौ विरुद्ध बंगळुरु सामन्यात यांच्यात पुन्हा चकमक उडाली. या सामन्यात गौतम गंभीर लखनौ संघाचा मार्गदर्शक आणि विराट कोहली आरसीबीचा कर्णधार होता.
विराट कोहली आणि गंभीर यांच्यात वाद
लखनौ आणि बंगळुरु यांच्यातील सामन्या दरम्यान, कोहली आणि गंभीर या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यानंतर बीसीसीआयने दोघांना मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावला. 1 मे रोजी बंगळुरुने (Royal Challengers Bangalore) लखनौचा (Lucknow Super Giants) त्यांच्याच घरच्या मैदानावर 18 धावांनी पराभव केला. सामन्यादरम्यान विराट कोहली आणि नवीन हक यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. तर सामना संपल्यानंतर गंभीर आणि कोहली यांच्यात भांडण झालं.