एक्स्प्लोर

मुंबईने तिथेच सामना जिंकला; टीका करणारा इरफान पठाण हार्दिक पांड्याचं कौतुक करतो तेव्हा...

Punjab Kings vs Mumbai Indians: मुंबईच्या पंजाबविरुद्धच्या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या एका निर्णयाचं कौतुक केलं आहे. 

Punjab Kings vs Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) यंदाच्या सत्रातील आपला तिसरा विजय मिळवताना  पंजाब किंग्सला (Punjab Kings) 9 धावांनी पराभूत केले. पंजाबच्या आशुतोष शर्माने अर्थशतक झळकावत एक वेळ पंजाबच्या विजयाचे चित्र निर्माण केले; परंतु जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) व गेराल्ड कोएत्झीने निर्णायक मारा करत मुंबईला विजयी केले.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 192 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवच्या दमदार अर्धशतकामुळे मुंबईला मोठी धावसंख्या गाठता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. पंजाबच्या 14 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने पंजाबसाठी चांगली खेळी केली. मात्र संघाला विजय मिळवून देण्यात दोघांना अपयश आले. मुंबईच्या या विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू इरफान पठाणने हार्दिक पांड्याच्या एका निर्णयाचं कौतुक केलं आहे.  याआधी हार्दिक पांड्याने कर्णधारपद योग्यरित्यान हाताळल्याने, तसेच बुमराहला शेवटचे षटक न देता स्वत: शेवटचे षटक टाकल्याने इरफान पठाणने टीका केली होती.  

इरफान पठाण काय म्हणाला?

हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून सक्रिय होता आणि त्याने जसप्रीत बुमराहला 13 वे षटक देऊन सामनाच बदलून टाकला. बुमराहला शेवटच्या षटकांसाठी ठेवले नाही. हार्दिकने तसे केले असते, तर मुंबई इंडियन्सने सामना तेथेच गमावला असता, कारण पंजाबकडून शशांक स्फोटक फलंदाजी करत होता. बुमराहला 13वे षटक दिलं, तेथेच मुंबईने सामना जिंकला, असं म्हणत इरफान पठाणने कौतुक केलं. 

मुंबईचा विजय-

मुल्लानपूर येथे झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 192 धावा केल्या. संघासाठी सूर्यकुमार यादवने 53 चेंडूंत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 78 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्सचा संघ 19.1 षटकांत 183 धावांवर सर्वबाद झाला.

आयपीएलच्या गुणतालिकेची स्थिती काय?

गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानने आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले असून, त्यानंतर त्यांचे 12 गुण झाले आहेत. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. कोलकाताचा नेट रनरेट +1.399 आहे, चेन्नईचा +0.726 आणि हैदराबादचा +0.502 आहे. लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 6-6 गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. लखनौचा नेट रनरेट +0.038 आहे, दिल्लीचा आहे -0.074 आणि मुंबई इंडियन्सचा -0.133 आहे. यानंतर पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.251 च्या नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे. बेंगळुरूने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे. बेंगळुरूचे 2 गुण आहेत. 

संबंधित बातम्या:

शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video

आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल; शुभमन गिलही बघतच बसला, नेमकं प्रकरण काय? Video एकदा पाहाच!

पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget