आयपीएलची नवीन मिस्ट्री गर्ल; शुभमन गिलही बघतच बसला, नेमकं प्रकरण काय? Video एकदा पाहाच!
शुभमन गिलच्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
आयपीएल 2024 च्या 32 व्या सामन्यात गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) 6 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत गुजरातचा संपूर्ण संघ 89 धावांत तंबूत परतला आणि दिल्लीने 8.5 षटकांत हा सामना जिंकून मोठ्या विजयाची नोंद केली.
गुजरातचा कर्णधार शुभमन गिल या सामन्यात फक्त 8 धावा करू शकला. पण, या पराभवाची चर्चा सोडून शुभमनच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सदर व्हिडीओत स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवर जेव्हा मिस्ट्री गर्ल दिसते, तेव्हा डग आऊटमध्ये बसलेल्या शुभमन दिलेली रिॲक्शन व्हायरल होत आहे.
Shubman Gill doesn't seem too broken up about this loss... 😏 #ShubmanGill #IPL #T20WorldCup pic.twitter.com/UL1MK2o63b
— GameDayGuru (@SixesAndWides) April 17, 2024
सदर व्हिडीओबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र राहुल तेवातियासाठी जेव्हा डीआरएस घेतला गेला आणि त्यात तो बाद असल्याचे दिसले, तेव्हा शुभमनची ही रिॲक्शन होती, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
#GTvDC
— theboysthing_ (@Theboysthing) April 17, 2024
You can hear the dialogue 😹 ( Shubman gill maar khayega ab ) pic.twitter.com/tKJVuPh9Li
दिल्लीचा विजय-
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क यांच्यात पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली. स्पेन्सर जॉन्सनने संघाला पहिला धक्का दिला. त्यांनी मॅकगर्कची शिकार केली. त्याला दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 20 धावा करता आल्या. तर शॉ केवळ सात धावा करू शकला. या सामन्यात अभिषेक पोरेलने 15, शाई होपने 19, ऋषभ पंतने 16 आणि सुमित कुमारने 9 धावा केल्या. पंत आणि सुमित नाबाद राहिले.
राजस्थान अजून अव्वल स्थानी-
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. राजस्थानने आतापर्यंत 7 पैकी 6 सामने जिंकले असून, त्यानंतर त्यांचे 12 गुण झाले आहेत. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. कोलकाताचा नेट रनरेट +1.399 आहे, चेन्नईचा +0.726 आणि हैदराबादचा +0.502 आहे. लखनौ सुपर जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 6-6 गुणांसह अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. लखनौचा नेट रनरेट +0.038 आहे, दिल्लीचा आहे -0.074 आणि मुंबई इंडियन्सचा -0.133 आहे. यानंतर पंजाब किंग्स 4 गुण आणि -0.251 च्या नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तळाच्या म्हणजे 10व्या स्थानावर आहे. बेंगळुरूने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे. बेंगळुरूचे 2 गुण आहेत.
संबंधित बातम्या:
शेवटचं षटक टाकण्यासाठी आला, फक्त रोहितसोबत बोलत राहिला; हार्दिकला केले दुर्लक्ष, पाहा Video
पत्नीने निर्माण केलीय वेगळी ओळख; कसं आहे मुंबईच्या संघातील टीम डेव्हिडचं खासगी आयुष्य?