IPL 2022 : आरसीबी यंदा आयपीएल जिंकणार, इंग्लंडच्या माजी खेळाडूचं भाकीत
IPL 2022 : दहा गुणांसह आरसीबीचा संघ गुणतालिकेत (ipl points table 2022) दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाची कामगिरी आणि खेळाडूचा फॉर्म पाहाता यंदा आयपीएलच्या विजेतेपदासाठी आरसीबीला दावेदार मानले जात आहे.
IPL 2022, RCB : आयपीएलच्या 15 व्या हंगामात आरसीबीने (Royal Challengers Bangalore) दणक्यात सुरुवात केली आहे. दहा गुणांसह आरसीबीचा संघ गुणतालिकेत (ipl points table 2022) दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघाची कामगिरी आणि खेळाडूचा फॉर्म पाहाता यंदा आयपीएलच्या विजेतेपदासाठी आरसीबीला दावेदार मानले जात आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन यानेही यंदा आयपीएलच्या चषकावर आरसीबी नाव कोरणार असल्याचे सांगितलं आहे. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ यंदा आयपीएलच्या चषकावर नाव कोरेल, असा विश्वास माइकल वॉन याने व्यक्त केला आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने यंदा आरसीबीला पसंती दर्शवली आहे. डु प्लेसिसच्या नेतृत्वातील आरसीबीचा संघ मायकल वॉनचा फेवरेट आहे. लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) आरसीबीने 18 धावांनी पराभव केल्यानंतर मायकल वॉन म्हणाला की, 'डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबी यंदा आयपीएल चषकावर नाव कोरेल यात शंकाच नाही.' मंगळवारी लखनौ विरोधात झालेल्या सामन्यात कर्णधार फाफ डु प्लेसिसने 96 धावांची खेळी केली, तसेच जोश हेजलवूडने चार विकेट घेतल्या. या बळावर आरसीबीने लखनौचा 18 धावांनी पराभव केला.
Without doubt @RCBTweets are the real deal this year under @faf1307 !!! #IPL2022
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 19, 2022
आरसीबीने दिलेले लक्ष राहुलच्या नेतृत्वाली लखनौ संघाला पार करताना अपयश आले. लखनौनं सुरुवातीलाच विकेट गमावल्या. हेजलवूडने नव्या चेंडूवर आणि डेथ ओव्हरमध्ये विकेट घेतल्या. इतकेच नाही तर हेजलवूडने धावाही दिल्या नाहीत. त्यामुळेच बलाढ्य लखनौच्या फलंदाजांवर दबाव वाढला. आरसीबीच्या गोलंगदाजांनी ठरावीक अंताराने लखनौच्या फलंदाजांना बाद केले. परिणामी आरसीबीने सामना 18 धावांनी जिंकला.
विराट कोहलीही प्रभावित -
आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीही संघाच्या कामगिरीवर खूश झाला आहे. लखनौविरोधात विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीने आनंद साजरा केला. तसेच आणखी एक विजय... आणखी पुढे... पुढे जात आहोत... अशी प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा
- DC vs PBKS, IPL 2022 : दिल्ली संघात कोरोनाच्या शिरकावामुळे आयपीएलच्या सामन्यात बदल; पुण्याऐवजी मुंबईत होणार सामना
- RR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार
- Mitchell Marsh Covid Positive: दिल्लीचा ऑलराऊंडर मिशेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह, उपचारासाठी रुग्णालयात दाखल