एक्स्प्लोर

RR vs MI, IPL 2022 :अखेर मुंबई इंडियन्सने विजयाचा केला श्रीगणेशा! राजस्थानवर पाच गड्याने विजय

RR vs MI, IPL 2022 Marathi News : लागोपाठ आठ पराभवानंतर अखेर मुंबईने राजस्थानचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने राजस्थानचा पाच गड्यांनी पराभव केला.

RR vs MI, IPL 2022 Marathi News : लागोपाठ आठ पराभवानंतर अखेर मुंबईने राजस्थानचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने राजस्थानचा पाच गड्यांनी पराभव केला. राजस्थान रॉयलने दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या भागिदारीच्या बळावर मुंबईने आपला पहिला विजय साकार केला. 

रोहित शर्मा आज पुन्हा अपयशी ठरला. अश्विनने रोहित शर्माला दोन धावांवर तंबूत धाडले. रोहितनंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांची भागिदारी मोठी होईल, असे वाटत असतानाच ट्रेन्ट बोल्टने ईशान किशनला बाद केले. ईशान किशन 26 धावा काढून बाद झाला. ईशान किशनने 18 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 26 धावा जोडल्या.  ईशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला जोडीला घेत मुंबईचा डाव सावरला. सूरकुमार यादवने 51 धावांची खेळी केली. सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांची जोडी यजुवेंद्र चहल याने फोडली. सूर्यकुमार यादवने 39 चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकरांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादवनंतर लगेच तिलक वर्माही बाद झाला. तिलक वर्माने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी 56 चेंडूत 81 धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडणार का? असे वाटले. पण टीम डेविड याने मोक्याच्या क्षणी विस्फोटक फलंदाजी करत विजय मिळवून दिला.  टीम डेविडने 9 चेंडूत 20 धावांची खेळी केली. पोलार्ड पुन्हा एकदा फ्लॉप झाला, त्याने 14 चेंडूत 10 धावांची खेळी केली. ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्र अश्विन आणि यजुवेंद्र चाहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

दरम्यान, जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 158  धावा केल्या.  प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. देवदत्त पडिक्कल (15) याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास अपयश आले. पडिक्कलनंतर कर्णधार संजू सॅमसनही माघारी परतला. संजू सॅमसनला फक्त 16 धावा करता आल्या. मुंबईकडून पदार्पण करणाऱ्य कार्तिकेय सिंह याने संजू सॅमसनचा अडथळा दूर केला.  डॅरेल मिचेलला प्रभावी कामगिरी करता आली नाही. मिचेल 17 धावांवर सॅम्सचा शिकार झाला. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रियान पराग तीन धावा काढून तंबूत परतला. रियानला रायली मेरिडेथने बाद कले. रविचंद्र अश्विन याने 9 चेंडूत 21 धावा करत राजस्थानची धावसंख्या वाढवली. अश्विन याने छोटेखानी खेळीदरम्यान एक षटकार आणि तीन चौकार लगावले. हेटमायरला फिनिशिंग टच देण्यात अपयश आले. हेटमायरने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत फक्त सहा धावांची खेळी केली.

मुंबईविरोधात बटलर पुन्हा चमकला - 
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबईविरोधात झालेल्या सामन्यात जोस बटलर याने शतकी खेळी केली होती. आजही बटलरने मुंबईची गोलंदाजी फोडून काढली. जोस बटलर याने सुरुवातीला सावध पवित्रा घेतला. जम बसल्यानंतर बटलरने धावांचा पाऊस पाडला. बटलरने 52 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चार षटकार आणि पाच चौकारांचा पाऊस पाडला.

बुमराहची पाटी कोरीच - 
पदार्पण कऱणाऱ्या कुमार कार्तिकेयला एक विकेट मिळाली. त्याशिवाय डॅनिअल सॅम्सलाही एक विकेट मिळाली. हर्तिक शौकीनची गोलंदाजी महागडी ठरली. शौकीन याने चार षटकात 47 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. रायले मेरिडेथ याला दोन विकेट मिळाल्या. जसप्रीत बुमराहाची पाटी कोरीच राहिली. बुमराहाला एकही विकेट मिळाली नाही. जसप्रीत बुमराहने चार षटकात 27 धावा खर्च केल्या. 

नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने -
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने 35 व्या वाढदिवसाला नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला .  

मुंबईच्या संघात दोन बदल - 
मुंबईने राजस्थानविरोधात संघात दोन बदल केले. मुंबईने डेवॉल्ड ब्रेविस आणि जयदेव उनादकट यांना वगळले. कुमार कार्तिकेय सिंह (Kumar Kartikeya Singh) आणि टीम डेविड यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आले. राजस्थान रॉयल्सने प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल केला नाही. मागील सामन्यातील विजयी संघ राजस्थानने कायम ठेवला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 PM : 6 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAir Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
सूरज चव्हाणला घेऊन मराठी सिनेमा काढणार, नाव झापूक झूपुक, मराठीतल्या टॉपच्या दिग्दर्शकाची टॉप घोषणा!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
Embed widget