Dinesh Karthik : 17 वर्षांचा झंझावात शांत, 39 वर्षीय दिनेश कार्तिकची आयपीएलमधून निवृत्ती, नवी इनिंग सुरु करणार Video
Dinesh Karthik retire from IPL : विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक यानं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. राजस्थानविरोधातील एलिमेनटर सामना त्याचा अखेरचा IPL सामना ठरला.
Dinesh Karthik retire from IPL : विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक यानं आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. राजस्थानविरोधातील एलिमेनटर सामना त्याचा अखेरचा ठरला. दिनेश कार्तिक याच्या रॉयल आयपीएल करियरला आज पूर्णविराम लागलाय. 39 वर्षीय कार्तिक 2008 पासून आयपीएलचा सदस्य राहिलाय. 17 वर्षानंतर कार्तिकने आयपीएलला रामराम ठोकलाय. पहिल्या आयपीएल हंगामापासून सलग 17 वर्षे खेळणाऱ्या मोजक्याच खेळाडूंमध्ये दिनेश कार्तिकचं नाव आहे. दिनेश कार्तिक, एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, वृद्धीमान साहा आणि मनिष पांडे यांनी आतापर्यंत प्रत्येक आयपीएल हंगाम खेळला आहे. आज दिनेश कार्तिक यानं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सामन्यानंतर हातवरे करत कार्तिकने सर्वांचे आभार मानले.
यंदाच्या हंगामात कार्तिकची कामगिरी -
दिनेश कार्तिक मागील तीन वर्षांपासून आरसाबीसाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. त्याने यंदाही आरसीबीसाठी शानदार फलंदाजी केली. दिनेश कार्तिक याने 13 डावात 326 धावांचा पाऊस पाडला. त्याची सर्वोच्च धावसंख्या 83 इतकी होती. दिनेश कार्तिकची सरासरी 36 इतकी होती. कार्तिकने 188 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. यंदाच्या हंगामात कार्तिकने दोन अर्धशतके ठोकली. कार्तिकने यंदाच्या हंगामात 22 षटकात आणि 37 चौकार ठोकले. यंदाच्या हंगामात आरसीबीसाठी सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये कार्तिक चौथ्या क्रमांकावर राहिलाय.
Happy Retirement Dinesh Karthik ❤️ #RRVSRCB pic.twitter.com/bWXuWOUXcu
— Sumit Mishra (@SumitLinkedIn) May 22, 2024
आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकची कामगिरी -
दिनेश कार्तिकने 257 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 26.32 च्या सरासरीने 4842 धावा केल्या आहेत.यामध्ये 22 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 135 इतका राहिलाय. दिनेश कार्तिकने 22 अर्धशतके ठोकली आहेत. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये 161 षटकार आणि 466 चौकार ठोकले आहेत. विकेटच्या मागेही कार्तिकला चांगलं यश मिळालेय. त्याने 145 झेल घेतलेत, त्याशिवाय 37 स्टफिंगही केल्यात.
पाहा व्हिडीओ :
Dinesh Karthik getting guard of honour from RCB and the crowd chanting 'DK, DK'.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 22, 2024
- The most emotional video. 🥹💔 pic.twitter.com/XZ3WmbO5Ne
आयपीएलमध्ये सहा संघाकडून खेळला, आतापर्यंत कार्तिकची कामगिरी -
दिनेश कार्तिक 2024 चा हंगामात आरसीबी संघाचा सदस्य राहिला. 2015 मध्येही तो आरसीबीचा सदस्य होता. 2016 च्या हंगामासाठी त्याला आरसीबीने रिलिज केले होते. त्यांतर पुन्हा त्याला ताफ्यात घेतले होते. आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकनं आतापर्यंत सहा संघाचे प्रतिनिधित्व केलेय. दिल्ली डेयरडेविल्स (2008-14), किंग्स इलेव्हन पंजाब (पंजाब किंग्स 2011), मुंबई इंडियन्स (2012-13), गुजरात लायन्स (2016-17), कोलकाता नाइट राइडर्स (2018-21) आणि आरसीबी (2015, 2022-आतापर्यंत) या सहा संघाकडू दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये खेळला आहे.
DK signing off 💔💔 pic.twitter.com/Nwzp06wrRM
— Archer (@poserarcher) May 22, 2024
आयपीएलमध्ये कर्णधार -
दिनेश कार्तिकनं आयपीएलमध्ये कर्णधारपदही भूषावलं आहे. दिल्लीच्या संघामध्ये असताना सहा वेळा बदली कर्णधार म्हणून तो मैदानात उतरला होता. तर कोलकाता संघासाठी 37 सामन्यात त्यानं नेतृत्व केलेय. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वात संघाने 21 विजय मिळवले अन् 21 पराभव पाहिले.
समालोचक म्हणून काम -
भारतीय क्रिकेटमध्ये संधी मिळणं कठीण झालं, तेव्हा दिनेश कार्तिकनं दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली. दिनेश कार्तिक यानं समालोचक म्हणून काम केलेय. कार्तिक आता चांगला ब्रॉडकास्टर म्हणून प्रसिद्ध झालाय. यापुढे दिनेश कार्तिक समालोचन करताना दिसेल. त्याला पुढील करिअरसाठी सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत.