IPL 2023 : पृथ्वी शॉ संघाबाहेर! दिल्लीची प्रथम फलंदाजी, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
DC vs SRH, IPL 2023 : दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
DC vs SRH, IPL 2023 : दिल्लीचा कर्णधार डेविड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली आणि हैदराबाद संघ गुणतालिकेत तळाशी आहेत. तळाशी असलेल्या संघात कोण वरचढ ठरणार हे सामन्यानंतरच समोर येईल. डेविड वॉर्नर आपल्या जुन्या फ्रेंचायझीसमोर खेळत आहे. दोन्ही संघात काही बदल करण्यात आला आहे. खराब फॉर्ममध्ये असलेल्या पृथ्वी शॉ याला डच्चू देण्यात आला आहे. डेविड वॉर्नर याने पृथ्वी शॉ याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
🚨 Toss Update from Hyderabad 🚨@DelhiCapitals have elected to bat against @SunRisers.
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
Follow the match ▶️ https://t.co/ia1GLIWu00#TATAIPL | #SRHvDC pic.twitter.com/6NhuZcxfaJ
सनराइजर्स हैदराबाद संघाचे 11 शिलेदार कोणते ?
अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्करम (कर्णधार), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जानसन, वाशिंगटन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक
We are bowling first 💪
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 24, 2023
Nattu is 🔙 in the playing XI 🔥 pic.twitter.com/MGnFqzFKKY
दिल्ली कॅपिटल्सचे 11 खेळाडू कोणते ?
डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप साल्ट (विकेटकीपर), मिशेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिख नॉर्किया, कुलदीप यादव, इशांत शर्मा
Match 34. Delhi Capitals XI: D Warner (c), S Khan, M Pandey, M Marsh, L Yadav, P Salt (wk), A Khan, R Patel, A Patel, K Yadav, A Nortje, I Sharma.https://t.co/PvfLJ7oumC #TATAIPL #SRHvDC #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
DC vs SRH Head To Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघांमध्ये आतापर्यंत 21 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये हैदराबाद संघाचं पारड किंचित जड आहे. हैदराबाद संघाने 21 पैकी 11 सामने जिंकले असून दिल्ली संघाला 10 सामने जिंकता आले आहेत. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Rajiv Gandhi International Stadium Pitch Report : राजीव गांधी स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील सामना राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (Rajiv Gandhi International Stadium) वर होणार आहे. ही खेळपट्टी पूर्णपणे सपाट असून गोलंदाजांना चांगला बाउंस देते. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना चांगला स्विंग आणि बाउन्स देते. पहिल्या डावात चांगली फलंदाजी होण्याची शक्यता आहे.