IPL 2022: लिलावात कुणी खरेदीही करत नव्हते, गुजरातने स्वस्तात मारली बाजी, मिलरने हार्दिकला फायनलला पोहचवले
RR vs GT, IPL 2022: गुजरातने राजस्थानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. या विजयाचा हिरो राहिलेला डेविड मिलरला आयपीएलच्या लिलावात खरेदी करण्यात कुणालाही रस नव्हता..
RR vs GT, IPL 2022: गुजरातने राजस्थानचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. या विजयाचा हिरो राहिलेला डेविड मिलरला आयपीएलच्या लिलावात खरेदी करण्यात कुणालाही रस नव्हता.. पहिल्या फेरीमध्ये डेविड मिलर अनसोल्ड राहिला होता..अखेर गुजरात टायटन्सने स्वस्तात मिलरला ताफ्यात घेतले होते.. मिलरने गुजरात संघाचा विश्वास सार्थ ठरवत वादळी खेळी केली.. क्वालिफायर 1 च्या सामन्यात मिलरने गुजरातला विजय मिळवून दिलाच..पण त्याआधीही लीग सामन्यात अनेकदा फिनिशरची भूमिका यशस्वी पार पाडली.
लिलावात अनसोल्ड राहिला होता मिलर -
क्वालिफायर 1 च्या सामन्यात सामनाविर पुरस्कार मिळवणारा डेविड मिलर आयपीएलच्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिला होता.. दुसऱ्या राऊंडमध्ये गुजरात आणि राजस्थान यांच्यामध्ये मिलरसाठी बोली लागली होती.. 16 व्या राऊंडमध्ये गुजरातने बाजी मारली होती. गुजरातने मिलरला तीन कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. मिलरची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.
राजस्थानविरोधात मॅचविनिंग खेळी -
क्वालिफायर-1 (IPL 2022 Qualifier 1) सामन्यात राजस्थान (Rajasthan Royals) विरोधात डेविड मिलरने (David Miller) सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. पहिल्या 14 चेंडूत मिलरने फक्त 10 धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील 24 चेंडूत मिलरने 58 धावा चोपल्या... डेविड मिलरने 38 चेंडूत 68 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. अखेरच्या षटकात गुजरातला विजयासाठी 16 धावांची गरज होती.. मिलरने विस्फोटक फलंदाजी करत प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या तीन चेंडूवर सलग तीन षटकार लगावत सामना जिंकून दिला..
आयपीएल 2022 मधील मिलरची कामगिरी -
30(21)
20*(15)
6*(4)
12(15)
31*(14)
94*(51)
27(20)
17(19)
39*(24)
11(14)
19*(14)
26(24)
15*(20)
34(25)
68*(38)
हे देखील वाचा-