Wankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवाद
Wankhde 50th Anniversary : वानखेडेचं अर्धशतक... बॅ. शेषरावांच्या नात मुक्ता वानखेडेंशी खास संवाद
सचिन नेमकं काय काय म्हणाला?
सचिन म्हणाला, आमच्या ड्रेसिंग रुममधील एका खेळाडूची सवय होती, त्याला म्हटलं की तू बॉलिंग करणार आहे. तर तो ड्रेसिंग रुममध्ये जाऊन बुट घालायचा. कधी बॅटिंगला जायला सांगितले तर डब्यातून काही खायचा. मात्र, ऐकेदिवशी आमच्या टीममधील दोन खोडकर मुलांनी ड्रेसिंग रुममध्ये गेले. आणि त्याचा डब्बा खाल्ला. त्याच्या डब्यातील सगळे वडापाव खाल्ले...त्यानंतर तो प्लेअर पॅड घालण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये गेला, तेव्हा त्याला डब्बा मोकळा दिसला. मग तो रागात बाहेर आला...सर्वांना विचारू लागला माझा डब्बा कोणी खाल्ला.? त्याने दंगा सुरु केला. प्रॅक्टिस थांबवा..डब्बा कोणी खाल्ला त्याचं पोट खराब होईल, असं म्हणाला. तो अर्धातास ओरडत होता..मात्र, नाव कोणीही सांगितले नाही...या गोष्टीला तीस वर्षे उलटले पण ते आम्ही सांगितलं नाही...आम्ही भेटल्यावर त्यावर चर्चा होते...पण आजवर आम्ही ते कोणालाही सांगितलं नाही. ड्रेसिंग रुममधील गोष्टी ड्रेसिंग रुममध्येच ठेवलं...मी आताही हे सांगणार नाही.