ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
सीआयडी कस्टडी संपत असल्याने वाल्किम कराडला आज बीड कोर्टात हजर करणार, सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची शक्यता
रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी महेंद्र थोरवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, सहपालकमंत्रिपद नको, पालकमंत्रीपदच हवं, थोरवेंची मागणी, तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल, गोगावलेंची प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच भाजपसोबत केंद्रात जातील, प्रहारच्या बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, तर शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपली, कडूंचं वक्तव्य
बिल्डरचा नाहक छळ केल्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून ईडीला एक लाखाचा दंड, कायद्याचा गैरवापर करुन त्रास देणं बंद करण्याची तंबी.. बिल्डरची ईडीकडे तक्रार करणाऱ्यालाही ठोठावला दंड
कुठल्याही योजनेत २ ते ४ टक्के भ्रष्टाचार असतोच, १ रुपयाच्या पीकविमा योजनेवर बोलताना कृषिमंत्र्यांकडून सरकारी योजनेतल्या सार्वत्रिक भ्रष्टाचाराची कबुली
दावोस दौऱ्यात पहिल्या दिवशी 4 लाख 60 हजार कोटींचे करार.. गडचिरोलीत जेएसडब्ल्यू तर राज्यात वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक