IND vs SA: 'उमरान मलिकचं भविष्य...' बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींचं मोठं वक्तव्य
IND vs SA: आयपीएलनंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
IND vs SA: आयपीएल 2022 नंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौरा करणार आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताशी पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या टी-20 मालिकेसाठी भारतीय नियामक मंडळानं भारतीय संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत अनेक युवा खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे. या यादीत सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचाही (Umran Malik) समावेश आहे. त्यानं या हंगामात चांगलं प्रदर्शन करून क्रिडाविश्वात आपली छाप सोडली आहे. दरम्यान, उमरान मलिकला भारतीय संघात स्थान मिळाल्यानंतर त्याच्याबाबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं (Sourav Ganguly) मोठ वक्तव्य केलं आहे.
दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेत उमरान मलिकला स्थान मिळाल्यानंतर सौरव गांगुलीनं त्याचं कौतूक केलं."मला खात्री आहे की उमरान भारतीय संघासाठी दीर्घकाळ खेळेल. मात्र, मलिकचं भविष्य खुद्द मलिकच्याच हाती आहे." उमरान मलिक व्यतिरिक्त गांगुलीनं आयपीएलमध्ये दमदार कागगिरी करणाऱ्या खेळाडूंचं कौतूक केलं आहे. "या हंगामात मुंबई इंडियन्सचा टिळक वर्मा, गुजरात टायटन्सचा राहुल तेवतिया यांनी चमकदार कामगिरी केली आहे. या हंगामात उमरान मलिक, मोहसीन खान, अर्शदीप सिंह आणि आवेश खान सारखे उगवते गोलंदाज आम्ही पाहिले. या लीगमुळे युवा खेळाडूंना चांगली संधी मिळते", असंही सौरव गांगुलीनं म्हटलं आहे.
उमरान मलिकची आयपीएल 2022 ची कामगिरी
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकनं 14 सामन्यात 22 विकेट घेतल्या होत्या. यादरम्यान, मलिकची इकोनॉमी 9.03 इतकी होती. तर स्ट्राइक रेट 13.57 इतका होता. मलिकनं या हंगामात सातत्यानं ताशी 150 किमी वेगानं गोलंदाजी केली आहे. त्याच्या वेगाचं अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतूक केलं आहे.
भारतीय क्रिकेट संघाच वेळापत्रक
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना 9 जून रोजी खेळला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेनंतर भारतीय आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड दौऱ्या एकमेव कसोटी सामना आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
हे देखील वाचा-