CSK vs DC : चेन्नई संघानं नाणेफेक जिंकली, पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेईंग 11
DC vs CSK, IPL Live Score, Playing 11 : चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेक जिंकली. कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
DC vs CSK, IPL 2023 Match 67 : इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये शेवटचे चार साखळी सामने शिल्लक आहे. आजच्या डबल हेडरमधील पहिला सामना चेन्नई आणि दिल्ली या दोन संघांमध्ये पाहायला मिळणार आहे. चेन्नई संघानं नाणेफेक जिंकली. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीनं फलंदाजीचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघ पहिल्यांदा गोलंदाजीसाठी उतरेल. आज चेन्नई संघासाठी करो या मरोची परिस्थिती आहे.
चेन्नई संघासमोर दिल्लीचं आव्हान
चेन्नई संघाकडे सध्या 15 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंतच्या 13 सामन्यांपैकी सात सामने जिंकले तर पाच सामने गमावले आहेत. या उलट दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असून संघाकडे आठ गुण आहेत. दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील 13 पैकी फक्त पाच सामने जिंकता आले असून आठ सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
पाहा प्लेईंग 11
चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.
दिल्ली कॅपिटल्स
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), यश धुल, फिलीप सॉल्ट (विकेटकीपर), रिली रुसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन सकारिया, खलील अहमद, एनरीज नॉर्टजे.
Kings take to the Dilli Darbaar today!👑#DCvCSK #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/H6ADs1TGSo
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 20, 2023
DC vs CSK Pitch Report : दिल्लीच्या खेळपट्टीचा अहवाल
आजचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) दुपारी 3.30 वाजता होणार आहे. अशा स्थितीत दव पडण्याची शक्यता नाही. दिल्लीच्या खेळपट्टीवर आतापर्यंत फिरकी गोलंदाजांची एकतर्फी कामगिरी पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत या मैदानावर खेळल्या गेलेल्या 83 सामन्यांपैकी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 36 वेळा विजय मिळवला आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 46 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक कोण जिंकतं हेही महत्त्वाचं ठरेल.
Today we play for you, Dilli 🫶
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 20, 2023
Let's roar together, one last time in #IPL2023! #YehHaiNayiDilli #DCvCSK #DCOriginals pic.twitter.com/bMkIUEsDDA
CSK vs DC Head to Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने 18 सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव केला आहे. दिल्ली संघाला मात्र चेन्नई विरुद्धचे फक्त 10 सामने जिंकता आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IPL 2023 : चेन्नई विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स घालणार इंद्रधनुष्य जर्सी, काय आहे कारण?