DC vs CSK, IPL 2023 Live Score : चेन्नई आणि दिल्ली संघात जंगी सामना, प्लेऑफमध्ये कोण पोहोचणार? सामन्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
DC vs CSK, IPL 2023 Live Score : चेन्नई आणि दिल्ली संघात जंगी सामना, प्लेऑफमध्ये कोण पोहोचणार? सामन्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...
LIVE
Background
DC vs CSK IPL 2023 Match Prediction : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 67 व्या सामन्यात आज चेन्नई आणि दिल्ली (DC vs CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. दिल्लीच्या घरच्या मैदानावर, अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) 20 मे रोजी दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी चेन्नई संघाला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवानंतर आज मैदानात उतरेल. तर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेला असला, तरी गेल्या काही सामन्यांमधील दिल्लीचा फॉर्म पाहता आजचा सामना जिकणं चेन्नईसाठी आव्हान असणार आहे.
चेन्नई प्लेऑफमध्ये पोहोचणार की दिल्ली मार्ग खडतर करणार?
आयपीएल 2023 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या दिल्ली संघांच्या आशेवर पाणी फिरलं आहे. मात्र, चेन्नई संघासाठी ही अखेरची संधी असेल. त्यामुळे चेन्नई (Chennai Super Kings) संघाला आजचा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास खडतर करण्याची शक्यता आहे. चेन्नई संघ सध्या गुणतालिकेत 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर दिल्ली संघ 10 गुणांसह नवव्या स्थानावर आहे. यंदाच्या आयपीएलमधील साखळी सामन्यांतील चेन्नई आणि दिल्ली संघाचा हा शेवटचा सामना असेल.
चेन्नई संघासमोर दिल्लीचं आव्हान
चेन्नई संघाकडे सध्या 15 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंतच्या 13 सामन्यांपैकी सात सामने जिंकले तर पाच सामने गमावले आहेत. या उलट दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असून संघाकडे आठ गुण आहेत. दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील 13 पैकी फक्त पाच सामने जिंकता आले असून आठ सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
CSK vs DC Head to Head : हेड टू हेड आकडेवारी
इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ एकूण 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने 18 सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव केला आहे. दिल्ली संघाला मात्र चेन्नई विरुद्धचे फक्त 10 सामने जिंकता आले आहेत.
IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात आज 20 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
चेन्नईचा दिल्लीवर विजय
चेन्नईचा दिल्लीवर विजय
चेन्नईला आठवा धक्का
चेन्नईला आठवा धक्का
चेन्नईला आठवा धक्का
चेन्नईला आठवा धक्का
दिल्लीला आठवा धक्का
दिल्लीला आठवा धक्का...ललीत यादव बाद
दिल्लीला सातवा धक्का
दिल्लीला सातवा धक्का.. डेविड वॉर्नर बाद