IPL 2023 : चेन्नई विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स घालणार इंद्रधनुष्य जर्सी, काय आहे कारण?
Delhi Capitals to Wear Rainbow Jersey : दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या शेवटच्या आयपीएल 2023 (IPL 2023) लीग सामन्यात इंद्रधनुष्य रंगाची जर्सी घालणार आहे
DC vs CSK, IPL 2023 : आज आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ त्यांचा शेवटचा लीग सामना खेळणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स (DC) शनिवारी, 20 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या आयपीएल साखळी (IPL 2023) सामन्यात विशेष इंद्रधनुष्य रंगाची जर्सी घालून उतरणार आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने भारताची विविधता साजरी करण्यासाठी 2020 पासून प्रत्येक हंगामात एका सामन्यासाठी जर्सी परिधान करण्याची परंपरा जोपासली आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, त्याचं हे रुप दाखवण्यासाठी दिल्ली संघ 2020 पासून एका सामन्याच इंद्रधनुष्य जर्सी घालून उतरतो. आजच्या सामन्यात इंद्रधनुष्य जर्सी घालून उतरणार आहे.
चेन्नई विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स घालणार इंद्रधनुष्य जर्सी
आयपीएल गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स संघ सध्या दुसऱ्या तर दिल्ली कॅपिटल्स नवव्या संघावर आहे. टॉप 4 मध्ये म्हणजेच प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला आजचा सामना जिंकणं आवश्यक आहे. दिल्ली कॅपिट्लस संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून आधीच बाहेर गेला आहे. असं असलं तरी, दिल्ली कॅपिटल्स चेन्नई पुढे अडचणी निर्माण करु शकतो.
इंद्रधनुष्य जर्सी घालण्यामागचं काय आहे कारण?
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ आज, दुपारी 3:30 वाजता इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध स्पेशल इंद्रधनुष्य जर्सी घालणार आहेत. 2020 पासून सुरू आयपीएलच्या मागील तीन हंगामामध्ये दिल्ली फ्रँचायझीने प्रत्येक हंगामात किमान एक खेळासाठी ही खास जर्सी घातली आहे. भारताची विविधता साजरी करण्याचा दिल्ली कॅपिटल्स संघाचा हा उपक्रम आहे.
Ending our #IPL2023 campaign on a 🌈 note!
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 19, 2023
Our boys will be donning these special threads in our last home match of the season at #QilaKotla! #YehHaiNayiDilli #DCvCSK pic.twitter.com/UuvM51Yo8R
आयपीएल 2022 मध्येही घातली होती 'ही' जर्सी
आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात इंद्रधनुष्य जर्सी घातली होती. नंतर त्याचा लिलाव करण्यात आला आणि ही रक्कम कर्नाटकातील इन्स्पायर इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्टला (IIS) मदत करण्यासाठी वापरण्यात आली.
कधी आणि कुठे रंगणार सामना?
आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन संघात लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.
1⃣0⃣ best comments will take home our Special Jersey 😍
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 20, 2023
All you need to do is 👇
👉 In one line, tell us why you love our special jersey 👕
👉 Tag three DC Fans in the comments 🐯#YehHaiNayiDilli #IPL2023 @davidwarner31 pic.twitter.com/vJaY7Z27wh
लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.