IPL 2022 : चेन्नईच्या पराभवानंतर CSK च्या चाहत्यांना आठवला सुरेश रैना, सोशल मीडियावर चर्चा
CSK IPL 2022 : चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांना सुरेश रैनाची आठवण आली. पंजाबविरोधातील सामन्यानंतर सोशल मीडियावर मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाची चर्चा सुरु झाली होती.
CSK IPL 2022 : सोमवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्सने चेन्नई सुपरकिंग्सचा 11 धावांनी परभव केला. चेन्नईची यंदा आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी झाली आहे. चेन्नईला आठ पैकी सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. यापूर्वी आयपीएलच्या कोणत्याही हंगमात चेन्नईची इतकी खराब अवस्था झाली नव्हती. चेन्नईला सतत पराभवाला सामोरं जावे लागतेय. चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांना सुरेश रैनाची आठवण आली. पंजाबविरोधातील सामन्यानंतर सोशल मीडियावर मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनाची चर्चा सुरु झाली होती.
मिस्टर आयपीएल सुरेश रैना चेन्नईकडून सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू आहे. चेन्नईला चार विजेतेपद मिळवून देण्यात सुरेश रैनाचा सिंहाचा वाटा आहे. सुरेश रैना आयपीएलमध्ये पाच हजारांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू आहे. चेन्नईसाठी धावांचा पाऊस पाडणाऱ्या रैनाला यंदाच्या लिलावात घेतलं नाही. चेन्नईही आपल्या या भरोशाच्या खेळाडूला विसरली. लिलावात सुरेश रैना अनसोल्ड राहिला. कोणत्याही संघाने सुरेश रैनाला खरेदी केले नाही.
आयपीएलच्या 15 व्या हंगामात चेन्नईला सतत पराभवाला सामोरं जावे लागतेय. आतापर्यंत चेन्नईचे सहा पराभव झाले आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नईला सर्व सामने जिंकणे गरजेचं आहे. चेन्नई संघाला आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईची खराब अवस्था पाहून चाहत्यांना सुरेश रैनाची आठवण आली. सोशल मीडियावर सुरेश रैनाची चर्चे होत आहे. पंजाबविरोधात पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर चेन्नईच्या चाहत्यांना मिस्टर आयपीएलची आठवण आली. सोशल मीडियावर सोमवारी सुरेश रैनाची चर्चा सुरु होती. कुणाला कठीण परिस्थितीत सामना फिरवणारा सुरेश रैना आठवला. तर कुणाला जबरदस्त क्षेत्ररक्षण करणारा रैना आठवला... सोशल मिडियावर रैनाची चर्चा सुरु होती.
पाहा कोण काय म्हणाले...
CSK with CSK without Raina
— Ajit Somani (@SomaniAjit) April 26, 2022
Raina pic.twitter.com/2PXwFwNoVm
We are proud of what you have achieved till date, looking forward to more such memorable moments ahead❤🙌 @ImRaina #Raina #believe 💯 Artwork by ArtsyStuffs 👌 pic.twitter.com/DnU0ZW4yDC
— Akansha(Raina Ki Deewani)❤🇮🇳 (@akasureshraina) April 25, 2022
No one can be raina🔥💥👑@ImRaina pic.twitter.com/rbfHPSvbzQ
— Aravind (@aravindkishore5) April 25, 2022
Chennai Super Kings is missing @imraina in fielding, more than anything else at the moment. Quick fire throws, direct hits and forever safe catching hands. pic.twitter.com/wjQFMfbwPD
— Amit Mishra (@MishiAmit) April 25, 2022
Raina isn't far behind in terms of IPL runs.
— Akash Kumar Jha (@Akashkumarjha14) April 26, 2022
Get him in the team as well Kaif Sahab, I am sure he'll enjoy playing on those Australian pitches. https://t.co/b2xhhqtrNq
SURESH RAINA THE GUN FIELDER 💯🔥😎#SureshRaina @ImRaina #MrIPL pic.twitter.com/m2KAvzbkNP
— Vaishnavi Raina ♡ (@Vaishu_Raina3) April 25, 2022
Those Saviour knocks by Raina, that’s what CSK missing! pic.twitter.com/zxHnkR5vuc
— Rajwardhan (@im_Rajwardhan) April 25, 2022
CSK is missing Raina's electric fielding.
— Surosh Rena (@im_vivank) April 25, 2022
That's it. That's the tweet pic.twitter.com/J6Vt7Kg2UF
दरम्यान, आयपीएलच्या आजच्या सामन्यात एक रोमहर्षक लढत पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स (PBKS vs CSK) संघात पाहायला मिळाली. यावेळी पंजाबने चेन्नईवर 11 धावांनी विजय मिळवला खरा पण सामना अखेरच्या षटकापर्यंत चुरशीचा झाला. सामन्यात अंबाती रायडूच्या तुफानी खेळीने सर्वांचीच मनं जिंकली, फक्त अंबाती सामना जिंकू शकला नाही. पंजाबने दिलेल्या 188 धावांचे लक्ष्य पार करताना चेन्नईचा संघ 176 धावाच करु शकल्याने 11 धावांनी चेन्नईचा पराभव झाला.