Rinku Singh : युनिवर्स बॉसही झाला रिंकूचा फॅन, म्हणाला पुढील वर्षी...
Chris Gayle On Rinku Singh : कोलकात्याचा फिनिशर रिंकू सिंह (Rinku Singh) याने सर्वांनाच प्रभावित केलेय.
Chris Gayle On Rinku Singh : कोलकात्याचा फिनिशर रिंकू सिंह (Rinku Singh) याने सर्वांनाच प्रभावित केलेय. प्रत्येकजण रिंकूचे कौतुक करतोय. यामध्ये युनिवर्स बॉस ख्रिस गेल (Chris Gayle) याचाही समावेश झालाय. वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) याने रिंकू सिंह (Rinku Singh) याचे कौतुक केलेय. आगामी हंगामात रिंकू सिंह याच्यावर पैशांचा पाऊस पडणार असल्याचे भाकितही युनिवर्स बॉसने केलेय. पुढील वर्षी रिंकू सिंह (Rinku Singh) याला मोठी रक्कम मिळू शकते.. पण कोलकाता संघ रिंकूला करारमुक्त करण्याची शक्यता कमीच आहे,असेही गेल म्हणाला. यंदाच्या हंगामात (IPL 2023) कोलकात्यासाठी (Kolkata Knight Riders) रिंकू सिंह याने दमदार प्रदर्शन केलेय. रिंकू याच्या कामगिरीने सर्वजण प्रभावित झालेत.
झहीर काय म्हणाला ?
भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान यानेही रिंकू सिंह याचे कौलुक केलेय. झहीर म्हणाला की, आगामी हंगामात रिंकू अधिक आक्रमक दिसेल. आंद्रे रसेलप्रमाणे तो सहज षटकार लगावेल.. तसे झाले तर आश्चर्य वाटायला नको. यंदाच्या हंगामात कोलकात्यासाठी रिंकू सिंह सकारात्मक ठरलाय. पुढील हंगामत रिंकू आणखी विस्फोटक होईल, असे झहीर खान म्हणाला..
यंदाच्या हंगामात रिंकूने किती धावा चोपल्या ?
रिंकू सिंह याने 14 सामन्यात 474 धावा चोपल्या आहेत. यामध्ये तो सहा वेळा नाबाद राहिलाय. रिंकूने 60 च्या सरासरीने आणि 150 च्या स्ट्राईक रेटने यंदा फलंदाजी केली आहे. रिंकूने 4 अर्धशतके झळकावली आहेत. रिंकू सिंह याने यंदाच्या हंगामात 29 षटकार आणि 31 चौकार लगावले आहेत. फिल्डिंग करताना त्याने आठ झेलही घेतले आहेत.
फिनिशर रिंकू...
धावांचा पाठलाग करताना रिंकू सिंह अधिक आक्रमक होतो.. रिंकू सिंह याने यंदाच्या हंगामात धावांचा पाठलाग करताना 305 धावा केल्या आहेत. त्याही अतिशय कठीण परिस्थितीमध्ये ... कोलकात्याची फलंदाजी ढेपाळल्यानंतर रिंकू याने डाव सावरला आहे. रिंकू याने सात सामन्यात धावांचा पाठलाग करताना 305 धावा केल्या आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 175 इतका होता. रिंकू याने सात सामन्यात चार अर्धशतके झळकावली आहेत... तर 22 षटकार मारले आहेत. रिंकू सिंह याने गुजरातविरोधात सलग पाच षटकार लगावत बाजी पलटवली होती. कोलकात्यासाठी रिंकू नवा फिनिशर झालाय.... आंद्रे रसेल फॉर्मात नसतानाही कोलकात्याने रिंकूच्या मदतीने अनेकदा सामना जिंकलाय.
संकटमोचक रिंकू -
कोलकात्याचा संघाची आघाडीच फळी ढेपाळल्यानंतर नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांनी डाव सावरलाय. रिंकू सिंह याने अखेरपर्यंत कोलकात्यासाठी लढा दिलाय. काही सामन्यात त्याने कोलकात्याला विजय मिळवून दिला. तर काही सामने शेवटच्या चेंडूपर्यंत नेले.. कोलकात्यासाठी रिंकू संकटमोचक ठरलाय. रिंकूचा मागील काही सामन्यातील परफॉर्म कसा राहिलाय... Rinku's rescues:
3/16, he scored 35(28)
3/92, he scored 42*(23)
5/142, he scored 40(15)
3/47, he scored 46(33)
3/128, he scored 48*(21)
5/96, he scored 58*(31)
4/70, he scored 53*(33)
3/35, he scored 46(35)
4/124, he scored 21*(10)
3/33, he scored 54(43)
3/82, he scored 67*(33)