IPL 2022: आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर दीपक चहर झाला भावूक, सोशल मीडियावर केली 'अशी' पोस्ट
IPL 2022: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान दीपकच्या पायाला दुखापत झाली होती.
Back injury rules Deepak Chahar out of IPL 2022: चेन्नई सुपर किंग्जचा स्टार गोलंदाज दीपक चहर आयपीएल 2022 मधून बाहेर झालाय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान दीपकच्या पायाला दुखापत झाली होती. त्याच्या क्वाड्रिसेप्स स्नायूंना दुखापत झाली होती. पुनर्वसनासाठी तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत गेला. पायाची दुखापत बरी होत होती, पण त्यानंतर दीपकच्या पाठीला दुखापत झाली. दरम्यान, आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर दीपक चहरनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे.
आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये चेन्नईनं दीपक चाहरला 14 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. तो आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू आहे. दरम्यान, दीपक चहर मागील अनेक दिवसांपासून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. ज्यामुळं त्याला आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावं लागलं. याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा पाठीचा त्रास होत असल्याची माहिती समोर आली होती. यामुळं यंदाच्या हंगामात तो खेळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जातं होतं. दीपक चहर मागील अनेक दिवसांपासून बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार घेत आहे. दीपक चाहरचं आयपीएलमधून बाहेर जाणं चेन्नईच्या संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दीपक चहर ट्विटर पोस्ट-
आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली आहे. "दुखापत झाल्यामुळं मला यंदा आयपीएल खेळता येणार नाही. माझी खेळण्याची खूप इच्छा होती. मी जसा आहे, त्यापेक्षा चांगल्या स्थितीत कमबॅक करेल. तुम्ही कायम दिलेल्या प्रेम, सदिच्छा आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. लवकरच तुम्हाला भेटेल.”
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नईच्या संघ कठीण टप्प्यातून जात आहे. चेन्नईनं आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे. चेन्नईच्या पराभवाचे प्रमुख कारण म्हणजे कमकुवत गोलंदाजी. अशा परिस्थितीत चेन्नईला आपला स्टार गोलंदाज दीपक चहरची खूप उणीव भासू शकते.
हे देखील वाचा-