RR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार
RR Vs KKR, IPL 2022: प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 217 धावा केल्या.
![RR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार RR Vs KKR: Rajasthan Royals won match by 7 runs against Kolkata Knights Riders at Brabourne Stadium RR Vs KKR: फिंच- अय्यरची अर्धशतकी खेळी व्यर्थ; कोलकात्याचा 7 धावांनी पराभव, चहल ठरला राजस्थानच्या विजयाचा शिल्पकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/18/a5121c539bb7a4c75802250fec9231cc_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
RR Vs KKR, IPL 2022: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडिअमवर (Brabourne Stadium) खेळण्यात आलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं कोलकाता नाईट रायडर्सला 7 धावांनी पराभूत केलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या राजस्थानच्या संघानं 20 षटकात 5 विकेट्स गमावून 217 धावा केल्या. प्रत्युरात कोलकात्याच्या संघ 210 धावांवर आटोपला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कलनं आक्रमक फलंदाजी करत राजस्थानच्या संघाला दमदार सुरुवात करून दिली. राजस्थानच्या संघानं 97 धावांवर पडिक्कलच्या रुपात पहिला विकेट्स गमावला. मात्र, त्यानंतरही बटलरनं आपली आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवली. राजस्थानचा एक विकेट्स पडल्यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार संजू सॅमसननं जॉस बटलरला साथ दिली. परंतु, आंद्रे रसलनं सोळाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनला माघारी धाडलं. त्यानंतर शिमरॉन हिटमायर मैदानात आला. दरम्यान, सतराव्या षटकातील चौथ्या चेंडूवर जॉस बटलरची आक्रमक खेळी संपुष्टात आली. त्यानं 61 चेंडूत 103 धावा केल्या. ज्यात पाच षटकार आणि नऊ चौकारांचा समावेश आहे. कोलकात्याकडून सुनील नारायणनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, शिवम मावी, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसलनं प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळवली.
राजस्थानच्या लक्ष्यानं दिलेल्या 218 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाताच्या संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या चेंडूवर सुनील नारायण रनआऊट झाला. त्यानंतर सलामीवीर आरोन फिंच आणि श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सावरला. आरोन फिंचनं 58 तर, श्रेयस अय्यरनं 85 धावांची तुफानी खेळी केली. आरोन फिंच आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर कोलकात्याच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अखेरच्या दोन षटकात उमेश यादवनं दोन षटकार मारून कोलकात्याच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र, त्यालाही संघाला विजय मिळवता आला नाही. राजस्थानकडून युजवेंद्र चहलनं सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)