Watch Video : लखनौचा कोलकात्यावर रोमहर्षक विजय, मेंटोर गौतम गंभीरची रिएक्शन व्हायरल
KKR vs LSG : आधी लखनौच्या क्विंटन डी कॉक आणि केएल राहुलच्या वादळी खेळीनंतर मोहसिन खानच्या भेदक गोलंदाजीनं लखनौनं कोलकात्याला मात दिली.

IPL 2022 : आयपीएल (IPL 2022) स्पर्धेच्या 66 व्या सामन्यात लखनौ सुपरजॉयंट्स (LSG) संघाने कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) 2 धावांनी मात दिली. 211 धावांच्या तगड्या टार्गेटचा पाठलाग करताना कोलकात्याचा संघ तब्बल 208 धावांपर्यंत मजल मारु शकला. पण आखेरच्या षटकात केकेआरला 21 धावांची गरज असताना सुनील नारायण आणि रिंकू सिंहने पहिल्या तीन चेंडूत 16 रन केले पण शेवटच्या 3 चेंडूत 5 धावा न करु शकल्याने अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला. दरम्यान या अत्यंत रोमहर्षक सामन्यात संघाचा विजय झाल्याने लखनौचा मेंटोर गौतम गंभीर इतका आनंदी झाला की त्याची आनंदातील दमदार रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला असून अनेकजण कमेंट्सही करत आहेत.
असा पार पडला सामना
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत लखनौच्या संघानं कोलकात्यासमोर 20 षटकात एकही विकेट गमावता कोलकात्यासमोर 211 धावांचं विशाल लक्ष्य ठेवलं. यावेळी क्विंटन डी कॉकनं 70 चेंडूत नाबाद 140 धावा केल्या. तर, केएल राहुलनं 51 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. ज्यानंतर लखनौनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकात्याच्या संघाची सुरुवात खराब झाली. कोलकात्याची सलामीवीर व्यंकटेश अय्यर (0 धावा) आणि अभिजीत टोमर (4 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर नितीश राणा आणि कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यरनं संघाचा डाव सावरला. परंतु, सातव्या षटकातील पहिल्या चेंडवर मार्कस स्टॉयनिसनं नितीश राणाला (42 धावा) बाद केलं. त्यानंतर श्रेयस अय्यरही बाद झाला. त्यानं 36 चेंडूत 50 धावांची खेळी केली.
कोलकात्याची चौथी विकेट पडल्यानंतर मैदानात आलेल्या सॅम बिलिंग्सनं आणि आंद्रे रसल संघाला विजय मिळवून देतील, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, हे दोघेही अपयशी ठरले. या सामन्यात सॅम बिलिंग्सनं 24 चेंडूत 36 आणि रसलनं 11 चेंडू खेळून फक्त पाच धावा केल्या. दरम्यान, अखेरच्या षटकात कोलकात्या विजयासाठी 21 धावांची गरज असताना रिंकू सिंहनं आक्रमक फलंदाजी केली. अखेरच्या षटकातील पहिल्या चार चेंडूत त्यानं 18 धावा कुटल्या. परंतु, दोन चेंडूत तीन धावांची आवश्यकता असताना तो बाद झाला. त्यानंतर अखेरच्या चेंडूत तीन धावांची गरज असताना मार्कस स्टॉयनिसनं कुलदीप यादवला बाद केलं. लखनौकडून मोहसीन खान आणि मार्कस स्टॉयनिसनं प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
