एक्स्प्लोर

DC vs RCB : कार्तिक-मॅक्सवेलची फटकेबाजी, हेजलवूडचा भेदक मारा, आरसीबीचा दिल्लीवर विजय

DC vs RCB: दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सेवलच्या वादळी अर्धशतकानंतर जोश हेजलवूडने केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर आरसीबीने दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला.

DC vs RCB : दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सेवलच्या वादळी अर्धशतकानंतर जोश हेजलवूडने केलेल्या भेदक माऱ्याच्या बळावर आरसीबीने दिल्लीचा 16 धावांनी पराभव केला. आरसीबीने दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला निर्धारित 20 षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात 173 धावांपर्यंत मजल मारता आली. आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधील हा चौथा विजय आहे. यासह गुणतालिकेत आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. 

आरसीबीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. 190 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना मोठी भागिदारी करु दिली नाही. डेविड वॉर्नरचं अर्धशतक आणि पंतच्या 34 धावांचा अपवाद वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. वॉर्नरने 38 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान वॉर्नरने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. तर पंतने 34 धावांच्या खेळीदरम्यान दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. या दोघांचा अपवाद वगळता दिल्लीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पृथ्वी शॉ 16, मिचेल मार्श 14, रॉवमन पॉवेल 00, ललीत यादव 1, शार्दुल ठाकूर 17 यांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. आरसीबीकडून जोश हेजलवूड याने भेदक गोलंदाजी केली. हेजलवूडने चार षटकात 28 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय हसरंगाला एक विकेट मिळाली. 

कार्तिकची फटकेबाजी, मॅक्सवेलचं शतक

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. सलामी फलंदाज अनुज रावत शून्य धावसंख्येवर बाद झाला. शार्दुल ठाकूरच्या अप्रितम चेंडूवर अनुज रावत पायचीत झाला. त्यानंतर आरसीबीच्या आजी-माजी कर्णधारांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण फाफ डु प्लेसिस अवघ्या 8 धावांवर बाद झाला. डु प्लेसिसनंतर विराट कोहलीही 12 धावा काढून तंबूत परतला. पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या सुयेश प्रभुदेसाईला दिल्लीविरोधात मोठी खेळी करण्यात अपयश आले. सुयेश अवघ्या सहा धावांवर बाद झाला. एका बाजूला विकेट पडत असताना मॅक्सवेल याने दुसरी बाजू लावून धरली. मॅक्सवेल याने दमदार अर्धशतकी करत संघाची धावसंख्या वाढवली. मॅक्सवेलने 34 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मॅक्सेवलने दोन षटकार आणि सात चौकार लगावले. मॅक्सवेलनं आरसीबीच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मॅक्सवेल बाद झाल्यानंतर आरसीबीच्या अडचणीत वाढ झाली होती. आरसीबी 150 धावांपर्यंत पोहचणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. पण कार्तिक आणि शाबाज यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी करत डावाला आकार दिला. दोघांनी मैदानावर स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. कार्तिकने मोक्याच्या क्षणी 34 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान कार्तिकने पाच षटकार आणि पाच चौकार लगावले. कार्तिकने मुस्तफिजूरच्या एका षटकात 28 धावा वसूल करत आरसीबीची धावसंख्या वाढवली. तर शाबाजनेही कार्तिकला उत्तम साथ दिली. शाबाजने 21 चेंडूत 32 धावांची खेळी केली. शाबाज आणि कार्तिक यांनी 52 चेंडूत 97 धावांची नाबाद भागिदारी केली. दोघांच्या फटकेबाजीच्या बळावर आरसीबीने 189 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. दिल्लीच्या गोलंदाजांपुढे आरसीबीच्या दिग्गज फलंदाजांनीही गुडघे टेकले. आघाडीचे सर्वच फलंदाज तंबूत परतले होते. मात्र, कार्तिक आणि मॅक्सवेलपुढे दिल्लीची गोलंदाजी कमकुवत भासत होती. दिल्लीकडून शार्दुल ठाकूर, खलील अहमद, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. शार्दुल ठाकूर यांनी सर्वात कमी धावा दिल्या. शार्दुल ठाकूरने चार षटकात 27 धावा देत एक विकेट घेतली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget