Akash Madhwal : आकाश मधवालची ऐतिहासिक कामगिरी, अनिल कुंबळेच्या 'अतूट' विक्रमाशी बरोबरी, लखनौविरोधात भेदक गोलंदाजीनं घेतल्या 5 विकेट
Akash Madhwal in IPL 2023 : आकाश मधवालने अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. कुंबळेने 2009 मध्ये 3.1 षटकात 5 धावा देऊन 5 बळी घेतले होते. मधवालने 3.3 षटकांत ही कामगिरी केली.
![Akash Madhwal : आकाश मधवालची ऐतिहासिक कामगिरी, अनिल कुंबळेच्या 'अतूट' विक्रमाशी बरोबरी, लखनौविरोधात भेदक गोलंदाजीनं घेतल्या 5 विकेट akash madhwal equaled with anil kumble s record took 5 wicket in mi vs lsg rising star mumbai indians better replacement for bumrah ipl 2023 live marathi news Akash Madhwal : आकाश मधवालची ऐतिहासिक कामगिरी, अनिल कुंबळेच्या 'अतूट' विक्रमाशी बरोबरी, लखनौविरोधात भेदक गोलंदाजीनं घेतल्या 5 विकेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/25/d398110abce82d3776f678ac984cee6d1684989486492322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Akash Madhwal Level up with Anil Kumble : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) मुंबई इंडियन्सला एक नवा स्टार मिळाला आहे. मुंबई इंडियन्सचा युवा खेळाडू आकाश मधवालच्या (Akash Madhwal) गोलंदाजीने सर्वांना चकित केलं आहे. आयपीएल 2023 मध्ये एलिमिनेटर सामन्यात (IPL 2023 Eliminator) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Gaints) 81 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्याचा खरा हिरो आकाश मधवाल ठरला. आकाश मधवालने लखनौच्या फलंदाजांची पुरती नाचक्की केली. आकाशने पाच विकेट घेत या सामन्यात विक्रमी कामगिरी केली आहे. या खेळीसह त्याने अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी
भेदक गोलंदाजी करत आकाश मधवालने अनिल कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आयपीएलमध्ये एका सामन्यात पाच विकेट घेत त्याने अनिल कुंबळेच्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात किफायतशीर पाच बळी घेण्याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आकाशने 5 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत. ही यंदाच्या आयपीएलमधील गोलंदाजांपैकी सर्वात चांगली खेळी आहे. याआधी कुंबळेने 2009 मध्ये 3.1 षटकात 5 धावा देऊन 5 बळी घेतले होते. मधवालने 3.3 षटकांत ही कामगिरी केली आहे.
A FIFER in a crunch game, giving away only five runs 👏🏻👏🏻
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2023
The Twitter world was in awe of the star of the #Eliminator, Akash Madhwal 🙌 #TATAIPL | #LSGvMI pic.twitter.com/Sd81kXLStL
मुंबई इंडियन्सचा नवा स्टार आकाश मधवाल
मुंबई इंडियन्सला आकाश मधवालच्या रूपाने एक नवा स्टार मिळाला आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 च्या एलिमिनेटर सामन्यात 5 विकेट घेत अनेक विक्रम मोडले. आकाश मधवालने या मोसमात गेल्या तीन-चार सामन्यांमध्ये धोकादायक गोलंदाजी केली आहे. या सामन्यात त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध तीन, सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चार आणि आता 5 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांची इकोनॉमीही उत्कृष्ट आहे.
आकाश मधवालनं संधीचं सोनं केलं
मुंबई इंडियन्सकडून आकाश मधवालला यंदाच्या हंगामात सुरुवातीला खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीत यश न मिळाल्याने आकाशला संधी देण्यात आली. त्यानं या संधीचं सोनं केलं. अवघ्या काही सामन्यांमध्ये आकाश या हंगामात मुंबई इंडियन्ससाठी सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
टीम इंडियाला मिळाला नवा यॉर्कर किंग, IPL मध्ये चमकला 'हा' खेळाडू; घेऊ शकतो बुमराहची जागा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)