MI vs GT : मुंबईला आता गुजरातचं आव्हान, दुसऱ्या क्वालिफायर सामन्याचा थरार; कुणाला मिळणार अंतिम फेरीचं तिकीट?
IPL Qualifier 2 : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या एलिमिनेटर सामन्यातील विजयी संघ 26 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध (GT vs MI) दुसरा क्वालिफायर सामना खेळेणार आहे.
IPL 2023 Qualifier 2, MI vs GT : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) 81 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबईने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश मिळवला आहे. आता मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) सामना गुजरात टायटन्सशी (Gujrat Titans) होणार आहे. मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावून 182 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना लखनौचा संघ 16.3 षटकांत अवघ्या 101 धावांवर गारद झाला. एलिमिनेटर (IPL 2023 Eliminator) सामन्यातील विजयी संघ 26 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujrat Titans) दुसरा क्वालिफायर (IPL 2023 Qualifier 2) सामना खेळेणार आहे.
मुंबईकडून लखनौचा 81 धावांनी पराभव
मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंनी फलंदाजी करत लखनौ विरुद्धच्या सामन्यात योगदान दिलं. कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर लखनौ संघाकडून नवीन-उल-हकने चार आणि यश ठाकूरने तीन बळी घेतले. मार्कस स्टॉइनिसने दुसऱ्या डावात लखनौसाठी सर्वाधिक 40 धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या आकाश मधवालने भेदक गोलंदाजी करत पाच गडी बाद केले.
मुंबई आणि गुजरात यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना
या सामन्यातील पराभवाने लखनौचे प्लेऑफमध्ये पहिला विजय मिळवण्याचे स्वप्न भंगलं आहे. या संघाने गेल्या वर्षी एलिमिनेटर सामनाही खेळला होता आणि त्यात पराभव झाला होता. याविजयासह मुंबईचा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पोहोचला. आता आयपीएलचा दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी, 26 मे रोजी खेळवला जाणार असून यामध्ये मुंबईचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. लखनौ संघाला सलग दुसऱ्या वर्षी एलिमिनेटर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाने आतापर्यंत प्लेऑफमध्ये एकही सामना जिंकलेला नाही. लखनौने प्लेऑफमध्ये दोन सामने खेळले असून दोन्ही सामने गमावले आहेत.
मुंबई इंडियन्स अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर
पाच वेळा विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ सातव्या अंतिम फेरीपासून एक पाऊल दूर आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक 41 धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवने 33 धावा केल्या. ग्रीन आणि सूर्या यांनी 66 धावांची भागीदारी करत संघाला चांगल्या धावसंख्येपर्यंत नेलं. युवा गोलंदाज आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करत सर्वांनाच चकित केलं. मधवालने 3.3 षटकात केवळ पाच धावा देत पाच बळी घेतले. आयपीएल 2023 (IPL 2023) मधील गोलंदाजाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.