(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 Points Table : RCB विरुद्धच्या विजयानंतर लखनौची पहिल्या नंबरवर मजल, 'हे' चार संघ प्ले ऑफमध्ये पोहोचणार; गुणतालिकेतील बदल पाहा
IPL Points Table : लखनौ सुपर जायंट्सने आरसीबीविरुद्ध विजय मिळवल्यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. या विजयासह लखनौने गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठला आहे.
Indian Premier League 2023 Points Table : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) चा यंदाचा 16 वा हंगाम सुरु आहे. आयपीएल 2023 मध्ये 10 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सने (LSG) रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध (RCB) सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लखनौने आरसीबीवर (RCB) दणदणीत विजय मिळवला आहे. यानंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. या विजयासह लखनौने गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठला आहे. लखनौने आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तीन विजयांनंतर, लखनौ संघाकडे 6 गुण आहेत आणि संघाचा नेट रनरेट +1.084 आहे. तर या सामन्यात पराभूत झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाकडे 2 गुण असून नेट रनरेट -0.800 इतका आहे. गुणतालिकेत आरसीबी सातव्या क्रमांकावर आहे.
पॉइंट टेबलमधील इतर संघांची स्थिती काय?
गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स (RR) संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. राजस्थान (RR) संघाकडे चार गुण झाले आहेत आणि नेट रनरेट +2.067 आहे. दुसरीकडे, कोलकाता संघ (KKR) 2 विजय, 4 गुण आणि +1.375 निव्वळ रनरेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स (GT) दोन सामन्यात विजयी झाला असून संघाकडे 4 गुण आहेत. +0.431 नेट रनरेटसह गुजरात चौथ्या आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) पाचव्या स्थानावर आहे. चेन्नई संघाने तीनपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. चेन्नई चार गुण आणि +0.356 नेट रनरेटसह पाचव्या स्थानावर आहे.
पंजाब किंग्स (PBKS) गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. लखनौकडून मिळालेल्या पराभवानंतर बंगळुरूचा (RCB) संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद (SRH) एका सामन्यात विजय मिळवून आठव्या क्रमांकावर आहे. अद्याप दोन संघांनी पाईंट टेबलमध्ये खातंही उघडलेलं नाही. मुंबई इंडियन्स (MI) नवव्या क्रमांकावर तर दिल्ली कॅपिटल्सचा (DC) संघ शेवटच्या क्रमांकावर आहे.
आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. पंजाब किंग्स दोन सामन्यांत मिळालेल्या विजयानंतर 4 गुण आणि -0.235 नेट रनरेटसह सहाव्या, आरसीबी (RCB) एक विजय, 2 गुण आणि -0.800 नेट रनरेटसह सातव्या आणि सनरायझर्स हैदराबाद एक विजय, 2 गुण आणि -1.502 नेट रनरेटसह सातव्या स्थानावर आहे. हैदराबाद आठव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, मुंबई -1.394 आणि दिल्ली -2.092 नेट रनरेटसह गुणतालिकेत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :