हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त वाटत नाही, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजानं उपस्थित केले प्रश्न
Hardik Pandya : वानखेडेच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सविरोधात (MI vs CSK) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला.
Adam Gilchrist On Hardik Pandya : वानखेडेच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सविरोधात (MI vs CSK) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नईने हार्दिक पांड्याच्या मुंबईला 20 धावांनी पराभूत करत दोन गुणांची कमाई केली. मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चौथ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर आणि कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) गोलंदाजी आणि फलंदाजी यंदाच्या हंगामात साधारण राहिल्याचं दिसलं. चेन्नईविरोधात हार्दिक पांड्यानं 3 षटकांमध्ये तब्बल 43 धावा खर्च केल्या. तर फलंदाजी करताना त्याला सहा चेंडूमध्ये फक्त दोन धावा काढता आल्या. हार्दिक पांड्याचं नेतृत्वही सामान्य राहिल्याची टीका करण्यात येत आहे. चेन्नईविरोधातील सामन्यानंतर हार्दिक पांड्या नेटकऱ्यांच्या निशाणावर आहेच. आशातच ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट यानं हार्दिक पांड्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलाय.
हार्दिक पांड्या 100 टक्के फीट नाही? काय म्हणाला गिलख्रिस्ट ?
अॅडम गिलख्रिस्टच्या मते मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पूर्णपणे फीट नाही. खासकरुन अखेरच्या षटकात त्यानं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, ते पाहून त्याच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित राहतात. धोनीनं हार्दिक पांड्याच्या चार चेंडूवर 20 धावा वसूल केल्या होत्या. हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर अॅडम गिलख्रिस यानेही सवाल उपस्थित केला, त्याशिवाय कौतुकही केले. 'हार्दिक पांड्या सर्व आव्हानाचा सामना करण्यासाठी नेहमीच तयार असतो, पण मला वाटत नाही तो 100 टक्के तंदुरुस्त असेल, असे गिलख्रिस्ट म्हणाला.'
Adam Gilchrist questions Hardik Pandya's fitness following MI's defeat to CSK in IPL 2024 https://t.co/1omHKRzkrM
— CricTracker (@Cricketracker) April 15, 2024
चेन्नई सुपर किंग्सने मुंबईचा केला पराभव -
वानखेडे मैदानावर चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला. हार्दिक पांड्यानं नाणेफेक जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना चार विकेटच्या मोबदल्यात 206 धावांचा डोंगर उभारला. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांनी शानदार अर्धशतकं ठोकली. प्रत्युत्तरदाखल मुंबई इंडियन्सला सहा विकेटच्या मोबदल्यात 186 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईकडून रोहित शर्मानं शानदार शतक ठोकलं, पण तो विजय मिळवून देऊ शकला नाही. रोहितचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मैदानावर स्थिरावता आलं नाही. मुंबई इंडियन्सचा सहा सामन्यातील चौथा पराभव झालाय. मुंबईचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर विराजमान आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सने सहा सामन्यात चौथ्या विजयाची नोंद केली. आठ गुणांसह चेन्नई गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
आणखी वाचा :
सामान्य नेतृत्व, खराब गोलंदाजी; हार्दिक पांड्यावर गावस्कर भडकले, पीटसरनने आरसा दाखवला!