Rohit Sharma : रोहित शर्माला वाढदिवसाचे गिफ्ट, हैदराबादमध्ये 60 फूट उंच कटआऊट
Hyderabad : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे 60 फूट उंच कटआऊट उभारण्यात आलेय.
60ft Cutout for Rohit Sharma in Hyderabad : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याचे 60 फूट उंच कटआऊट उभारण्यात येणार आहे. रोहित शर्माच्या चाहत्यांकडून हैदराबादमध्ये हे कटआऊट उभारण्यात येणार आहे. रोहित शर्मा याचा 30 एप्रिल रोजी जन्मदिवस आहे, त्याचे औचित्य साधत हैदराबादमधील चाहत्यांनी रोहित शर्माचे 60 फूट उंच कटआऊट उभारलेय. आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूचे इतके उंच कटआऊट उभारण्यात आलेले नाही, असा दावा सोशल मीडियात करण्यात येत आहे.
चाहत्यांचे क्रिकेटरबद्दलचे प्रेम जगजाहीर आहे. खेळाडूंना पाहण्यासाठी चाहते काहीही करायला तयार असतात. काही चाहते आपल्या आवडत्या खेळाडूसाठी कोणतीही गोष्ट करायला तयार होतात. आयपीएलमध्ये एक चाहता धोनीला पाहण्यासाठी 2 हजार किमीचा प्रवास करुन आला होता. विराट कोहली, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांचे जगभरात चाहते आहेत.
रोहित शर्माच्या चाहत्यांनी आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी कटआऊट उभारण्याचा निर्णय घेतला. 30 एप्रिल रोजी रोहित शर्माचा वाढदिवस आहे. हाच दिवस निवडत रोहित शर्माच्या चाहत्यांनी कटआऊट उभारण्याचा प्लॅन केला. रोहित शर्माचे कटआऊट तयार झालेले आहे. ते लवकरच उभारण्यात येणार आहे. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हिटमॅन अर्थात रोहित शर्माच्या वाढदिवसाला उभारण्यात येणारे कटआऊट सोशल मीडियावर व्हायरल झालेय. नेटकऱ्यांमध्ये या कटआऊटची चर्चा आहे. रोहित शर्माला आतापासूनच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मोठ्या खेळाडूचे मोठे कटआऊट असे काही नेटकरी सोशल मीडियावर म्हणत आहेत.
A 60ft cutout for Rohit Sharma will be unveiled on his birthday on 30th April in Hyderabad.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 28, 2023
- The biggest cutout ever for a cricketer! pic.twitter.com/ZPhIxRfmS3
आतापर्यंत इतके मोठे कटआऊट कोणत्याही क्रिकेटपटूचे उभारण्यात आलेले नाही. सोशल मीडियावर या कटआऊटची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील RTC X Roads वर रोहित शर्माचे 60 फूट उंच कटआऊट उभारण्यात येणार आहे. रोहित शर्माच्या वाढदिवसाचे मोठे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. सर्वात आधी कटआऊट रिव्हिल करण्यात येईल.. त्यानंतर केक कट करण्यात येणार आहे. त्याशिवाय डिजे आणि गाण्याचा माहोल असणार आहे. 30 एप्रिल रोजी रोहित शर्माचा वाढदिवस चाहते मोठ्या उत्साहात साजरा करणार आहेत.
दरम्यान, रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहे. रोहित शर्मा सध्या मुंबई संघाचे नेतृत्व करत आहे. 30 एप्रिल रोजी रोहित शर्माचा वाढदिवस आहे, त्याचदिवशी मुंबईचा संघ राजस्थानच्या संघासोबत दोन हात करणार आहे. रोहित शर्माला मुंबई विजयाची भेट देणार का? याकडे चाहत्यांचे लक्ष लागलेय. रोहित शर्मा याच्या वाढदिवसाला मुंबई इंडियन्सकडूनही खास नियोजन करण्यात आलेले असेल. मुंबईने काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकरचा वाढदिवसही खास साजरा केला होता.