2020 मध्ये म्हणाला स्पार्क नाही, आता धोनीनेचं दिलं कर्णधारपद, पुणेकर ऋतुराज चेन्नईचं नेतृत्व करणार!
CSK Captain Ruturaj Gaikwad: एमएस धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
CSK Captain Ruturaj Gaikwad: एमए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2024 च्या हंगामातील पहिला सामना गतविजेते चे चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (Royal Challegers Bangaluru) यांच्यात रंगणार आहे. यावेळी दोनही संघ सज्ज असताना चेपॉक देखील सज्ज झालं आहे. मात्र याचदरम्यान चेन्नईच्या ताफ्यात नवी घडामोड घडली आहे. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. एमएस धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
𝐈𝐭'𝐬 𝐒𝐡𝐨𝐰𝐓𝐢𝐦𝐞!
— IndianPremierLeague (@IPL) March 21, 2024
The #TATAIPL is here and WE are ready to ROCK & ROLL 🎉🥳🥁
Presenting the 9 captains with PBKS being represented by vice-captain Jitesh Sharma. pic.twitter.com/v3fyo95cWI
एमएस धोनीने 4 मार्च रोजी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर "नवीन हंगाम आणि नवीन 'भूमिका' साठी प्रतीक्षा करू शकत नाही", असं म्हटलं होतं. जवळपास दोन आठवड्यांनंतर धोनीच्या या पोस्टचा खरा संदर्भ आणि अर्थ समोर आला आहे.
युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही- एमएस धोनी
2020 च्या हंगामात ऋतुराज गायकवाडला संघासाठी धावा करता आल्या नाही. 2020मध्ये चेन्नई गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर होता. यशस्वी संघ म्हणून ओळख असणारा चेन्नईचा संघ प्लेऑफपर्यंत देखील पोहचला नव्हता. यावेळी कर्णधार एमएस धोनीने तरुण खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर चेन्नईने 2021 मध्ये धोनीच्या नेतृत्वात आणि ऋतुराज गायकवाडच्या जोरावर विजेतेपद पटकावलं होतं.
ऋतुराज गायकवाड कारकीर्द-
2018 मध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने ऋतुराज गायकवाडला खरेदी केले होते. 2019 च्या हंगामात ऋतुराज गायकवाडने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. ऋतुराज गायकवाडने जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरुद्ध भारतीय क्रिकेट संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2022 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा तो कर्णधार होता. 2021 च्या आयपीएल हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. तसेच T20 आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाचा कर्णधार आहे.