आयपीएलमध्ये ५ सामन्यात २ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची मोहम्मद शमीच्या जागी वर्णी; गुजरातची टायटन्सची घोषणा
IPL 2024: Gujarat Titans: आयपीएलचा हंगाम सुरु होण्याआधी दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या जागी वेगवान गोलंदाजाच्या नावाची घोषणा केली आहे.
IPL 2024: Gujarat Titans: आगामी आयपीएल 2024 च्या हंगामासाठी जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या हंगामातील पहिला सामना 22 मार्च रोजी होणार आहे. जिथे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जचा सामना फॅफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ चेन्नईत उपस्थित आहेत. दरम्यान, गुजरात टायटन्सनेही आपल्या तयारीसह सज्ज असून आयपीएलचा हंगाम सुरु होण्याआधी दुखापतग्रस्त मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) जागी वेगवान गोलंदाजाच्या नावाची घोषणा केली आहे.
मोहम्मद शमीच्या उजव्या टाचेवर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया झाली. यामुळे शमीने संपूर्ण आयपीएल स्पर्धेतून देखील माघार घेतली आहे. शमीच्या जागी कोणत्या खेळाडूचा गुजरातच्या संघात समावेश होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. यादरम्यान गुजरात संघाने शमीच्या जागी वेगवान गोलंदाज संदीप वॉरियरला ताफ्यात दाखल केले आहे. गुजरात टायटन्सने त्याला ५० लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले आहे.
Building 𝗧𝗶𝘁𝗮𝗻𝘀! 🙌 #TitansFAM, explore the facilities that fuel the Gujarat Titans! 🤩#AavaDe | #GTKarshe | #TATAIPL2024 pic.twitter.com/kQzuNdLcse
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 20, 2024
संदीप वॉरियरचा रेकॉर्ड काय?
संदीप वॉरियरने आतापर्यंत 5 आयपीएल सामने खेळले आहेत. संदीपच्या आयपीएल रेकॉर्डवर एक नजर टाकली तर त्याने 5 सामन्यात केवळ 2 विकेट्स घेतल्या आहेत. संदीप वॉरियरला आयपीएलमध्ये फारशा संधी मिळालेल्या नाहीत. तो केकेआरकडून आयपीएलमध्ये खेळला आहे. केकेआरने 2022च्या मेगा ऑक्शनमध्ये संदीप वॉरियरला रिलीज केले होते. यानंतर कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. याशिवाय संदीप वॉरियर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचाही भाग राहिला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो केरळकडून खेळतो.
गुजरातला भासेल शमीची उणीव-
गुजरात टायटन्स नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. गिलवर केवळ फलंदाजीचेच नव्हे तर कर्णधारपदाचेही दडपण असेल. अशा स्थितीत अनुभवी गोलंदाज शमीची अनुपस्थिती संघात निश्चितच जाणवणार आहे. शमी आयपीएल 2023 मधील मोसमातील आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज होता.
IPL 2024 साठी गुजरात टायटन्सचा संघ
शुभमन गिल (कर्णधार), केन विल्यमसन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), विजय शंकर, जयंत यादव, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रशीद खान, जोश लिटल, नूर अहमद, राहुल तेवाटिया, दर्शन नळकांडे, रशीद खान. किशोर, बी साई सुदर्शन, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरुख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुथार, स्पेन्सर जॉन्सन, रॉबिन मिंज, संदीप वॉरियर