एक्स्प्लोर

IPL 2024: आयपीएल 2024चे जेतेपद कोण पटकावणार?; CSKच्या चाहत्यांना न आवडणारी सुरेश रैनाची भविष्यवाणी!

Latest News Marathi: IPL 2024: आयपीएल 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे, पहिला सामना देखील चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु यांच्यात होणार आहे.

Latest News Marathi: IPL 2024: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2021 मध्ये त्याने शेवटचा आयपीएल हंगाम खेळला होता. त्यानंतर तो कधीही आयपीएलमध्ये दिसला नाही. सुरेश रैना अनेक वर्षे चेन्नईकडून खेळला आणि त्याने आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाला 4 वेळा विजेतेपद मिळवून दिले.

आता सुरेश रैना समालोचकाची भूमिका निभावत असतो. सुरेश रैना यावेळी उघडपणे आपलं मत मांडतो. सध्या एका कार्यक्रमात सुरेश रैनाने महत्वाचं विधान केलं आहे. सुरेश रैनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुरेश रैनाने आयपीएल 2024 च्या हंगामात कोण बाजी मारणार, याबाबत भविष्यवाणी केली आहे. 

आयपीएल 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे, पहिला सामना देखील  चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (Royal Challegers Bangaluru) यांच्यात होणार आहे. याचदरम्यान यंदाचा आयपीएलचा प्रमुख दावेदार आरसीबीचा संघ असल्याचं सुरेश रैनाने सांगितले आहे. आरसीबी एक उत्कृष्ट संघ आहे आणि संघाचे चाहते त्यांना नेहमीच पाठिंबा देतात. आयपीएल 2024 ची ट्रॉफी जिंकण्यासाठी आरसीबी प्रबळ दावेदार असल्याची भविष्यवाणी सुरेश रैनाने केली आहे. त्यामुळे रैनाची ही भविष्यवाणी खरी होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. तसेच सुरेश रैनाची ही भविष्यवाणी चेन्नई आणि एमएस धोनीच्या चाहत्यांना न आवडणारी आहे, हे नक्की.

पाहा IPL 2024 वेळापत्रक-

22 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, रात्री 8 वा.पासून, चेन्नई
23 मार्च - पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वा. पासून, मोहाली
23 मार्च - कोलकाता नाइट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, रात्री 8 वा. पासून, कोलकाता
24 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स, दुपारी 3.30 वा.पासून, जयपूर
24 मार्च - गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद
25 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू
26 मार्च - चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स, रात्री 8 वा.पासून, चेन्नई
27 मार्च - सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, रात्री 8 वा. पासून, हैदराबाद
28 मार्च - राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, रात्री 8 वा. पासून, जयपूर
29 मार्च - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू
30 मार्च - लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, लखनौ
31 मार्च - गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, दुपारी 3.30 वा. पासून, अहमदाबाद
31 मार्च - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, रात्री 8 वा. पासून, विशाखापट्टणम
1 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, रात्री 8 वा. पासून, मुंबई
2 एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. लखौ सुपर जायंट्स, रात्री 8 वा. पासून, बंगळुरू
3 एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, रात्री 8 वा. पासून, विशाखापट्टणम
4 एप्रिल - गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स, रात्री 8 वा. पासून, अहमदाबाद
5 एप्रिल - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू,रात्री 8 वा. पासून, जयपूर
6 एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वा.पासून, मुंबई
7 एप्रिल - लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स, रात्री 8 वा. पासून, लखनौ

संबंधित बातम्या:

IPL 2024: Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात अर्जुन तेंडुलकरहून लहान असलेल्या गोलंदाजाची एन्ट्री; विश्वचषकात प्रतिस्पर्धी संघावर पडला होता भारी

आयपीएलमध्ये ५ सामन्यात २ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाची मोहम्मद शमीच्या जागी वर्णी; गुजरातची टायटन्सची घोषणा

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Leopard In Chhatrapati Sambhajinagar: शेतपंप चालू करण्यासाठी जाताच हालचाल; बारकाईने बघताच विहिरीत बिबट्या दिसला, वैजापूरमधील घटना, पुढे काय घडलं?, PHOTO
शेतपंप चालू करण्यासाठी जाताच हालचाल; बारकाईने बघताच विहिरीत बिबट्या दिसला, वैजापूरमधील घटना, पुढे काय घडलं?, PHOTO
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Leopard In Chhatrapati Sambhajinagar: शेतपंप चालू करण्यासाठी जाताच हालचाल; बारकाईने बघताच विहिरीत बिबट्या दिसला, वैजापूरमधील घटना, पुढे काय घडलं?, PHOTO
शेतपंप चालू करण्यासाठी जाताच हालचाल; बारकाईने बघताच विहिरीत बिबट्या दिसला, वैजापूरमधील घटना, पुढे काय घडलं?, PHOTO
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Embed widget