Suraj Chavan Wedding: अरेंज वैगरे न्हाय, भावाचं लव्ह मॅरेज हाय; गुलिगत स्टार सूरज चव्हाण मामाच्या मुलीसोबत बोहल्यावर चढणार
Suraj Chavan Wedding: गेल्या काही दिवसांपासून 'सूरज लग्न कधी करणार?' या चर्चा रंगलेल्या. अशातच आता याचं उत्तर सर्वांना मिळालंय. झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाणची सध्या लगीनघाई सुरू आहे.

Suraj Chavan Wedding: 'बिग बॉस मराठी 5'च्या (Bigg Boss Marathi) ट्रॉफीवर आपलं नाव कोरून महाराष्ट्राच्या (Maharashtra News) घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे, गुलिगत स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan). अगदी साध्या आणि गरीब परिस्थितीतून आलेल्या सूरजला अख्ख्या महाराष्ट्रानं सपोर्ट दिला आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं. बिग बॉसच्या (Bigg Boss) घरात सूरजनं त्याच्या आयुष्याबाबत, त्याच्या प्रेमाबाबत काही किस्से सांगितलेले. त्यावेळी अवघ्या महाराष्ट्राचे डोळे पाणावलेले. तेव्हापासूनच अख्खा महाराष्ट्रानं सूरजला उचलून धरलं. त्यानंतर सूरजनं सिनेमाही केला. सिनेमा फारसा चालला नसला तरीसुद्धा त्याची चर्चा मात्र सगळीकडे झाली. अशातच गेल्या काही दिवसांपासून 'सूरज लग्न कधी करणार?' या चर्चा रंगलेल्या. अशातच आता याचं उत्तर सर्वांना मिळालंय. झापुक झुपूक स्टार सूरज चव्हाणची सध्या लगीनघाई सुरू आहे.
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर सूरजच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा आणि नाव समोर आले होते. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.आता अखेर सूरज चव्हाणच्या लग्नाची तारीख आणि ठिकाणही ठरलंय. सूरज आपल्या आयुष्याच्या नवा प्रवासाची सुरुवात कधी आणि कुठे करणार? याबाबत 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावकरनं खुलासा केला आहे.
अंकिता वालावलकरनं लोकमत सखीशी बोलताना याबाबत माहिती दिली. तिनं सांगितलं की, सूरज चव्हाणचा लग्नसोहळा 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यांचा हा पारंपरिक विवाह सोहळा पुण्याजवळील जेजूरी, सासवड इथे होणार आहे. लग्नाच्या मुख्य समारंभापूर्वीचे विधी 28 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या समारंभात हळद, मेहंदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक समारंभ पार पडतील.
अंकिता लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही...
अंकिता वालावलकरनं मुलाखतीत बोलताना माहिती दिली की, सूरजच्या लग्नादिवशीच तिच्या कुटुंबातील एका सदस्याचं लग्न असल्यानं ती सूरजच्या लग्नासाठी उपस्थित राहणार नाही. त्यामुळेच तिनं सूरज आणि संजयनाला लग्नाच्या सर्व शॉपिंगमध्ये मदत केली. अंकितानं त्याला लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी मदत केली. त्यासोबतच संजनाच्या साड्यांचं सिलेक्शन, सूरजच्या कपड्यांच्या सिलेक्शनसाठीही मदत केली.
View this post on Instagram
सूरज चव्हाणची होणारी बायको कोण? (Suraj Chavan Love Story)
'बिग बॉस मराठी' फेम सूरज चव्हाणनं काही दिवसांपूर्वी आपल्या होणाऱ्या बायकोसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेले. पण, त्यानं तिचा चेहरा दाखवला नव्हता. तेव्हापासूनच सूरजची होणारी बायको कोण? हा प्रश्न चाहत्यांना पडलेला. पण, आता सूरज चव्हाणच्या होणाऱ्या बायकोबाबतची उत्सुकता संपली असून ती कॅमेऱ्यासमोर आलीय. सध्या सूरजवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय, पण ती सूरजचा भेटली कुठे? हा प्रश्न चाहत्यांना पडलाय. याचाही खुलासा झाला आहे.
'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर हिनं लोकमत सखीशी बोलताना एक खुलासा केला. अंकिता वालावलकरनं सांगितलं की, संजना ही सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे. गंमत म्हणजे, सूरज आणि संजनाचं अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. काही दिवसांपूर्वीच अंकितानं सूरज आणि संजयनाचं तिच्या घरी 'केळवण' केलं आणि दोघांना भेटवस्तूही दिल्यात. तसेच, तिनं दोघांनाही लग्नाची शॉपिंग करायलाही मदत केली. या खास व्लॉग अंकितानं तिच्या चॅनलवर शेअर केलाय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























