(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 Auction Updates : इतिहासात पहिल्यांदाच साता समुद्रापार आयपीएल लिलाव; 333 खेळाडू रांगेत अन् कोणाकडे किती कोटी शिल्लक?
IPL 2024 Auction Updates : लिलावासाठी निवडलेल्या 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आहेत, तर 119 परदेशी खेळाडू आहेत. तसेच, या यादीत 111 कॅप्ड आणि 215 अनकॅप्ड खेळाडू आहेत.
IPL 2024 Auction Updates : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 मिनी लिलावासाठी क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे. हा लिलाव उद्या (19 डिसेंबर) दुबईत होणार आहे. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच हा लिलाव परदेशात होणार आहे. या लिलावात 333 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.
IPL AUCTION TOMORROW ...!!!!pic.twitter.com/nCap5bTMGt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 18, 2023
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली होती. यावेळी हा मिनी लिलाव भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होईल. लिलावासाठी निवडलेल्या 333 खेळाडूंपैकी 214 भारतीय आहेत, तर 119 परदेशी खेळाडू आहेत. तसेच, या यादीत 111 कॅप्ड आणि 215 अनकॅप्ड खेळाडू आहेत.
Ravi Ashwin predicts Pat Cummins and Mitchell Starc will go beyond 14cr in IPL 2024 auction. pic.twitter.com/DQOPZhl2ld
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 18, 2023
या यादीत 23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी
या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.
Predict the price tag of players in IPL auction:
— Johns. (@CricCrazyJohns) December 18, 2023
Mitchell Starc -
Harry Brook -
Kartik Tyagi -
Pat Cummins -
Travis Head - pic.twitter.com/7bxz9EEWLj
गुजरात संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक पैसे शिल्लक
गुजरात टायटन्सच्या पर्समध्ये सर्वाधिक 38.15 कोटी रुपये शिल्लक आहेत. म्हणजेच हा संघ लिलावात सर्वाधिक पैसा खर्च करू शकतो. तर आता त्याला फक्त 8 खेळाडू खरेदी करायचे आहेत. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) च्या पर्समध्ये सर्वात कमी 13.15 कोटी रुपये शिल्लक आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील या संघाला आता आणखी 6 खेळाडू खरेदी करायचे आहेत.
BCCI is set to announce an incentive plan for uncapped players ahead of IPL 2024 auction. [Cricbuzz]
— Johns. (@CricCrazyJohns) December 17, 2023
- This is to reward the players who earn International cap in between the seasons, it can double up if their min fee is 50 Lakhs as they play 10 or more games for India. pic.twitter.com/ClQs2sowAg
इतर महत्वाच्या बातम्या