RR vs RCB, Match Highlights : बंगळुरुचा राजस्थानवर 7 गडी राखून विजय, मॅक्सवेलचं अर्धशतक
IPL 2021, RR vs RCB : रॉयल चॅलेंजर्सचा हा या हंगामातील सातवा विजय आहे. आरसीबी 11 सामन्यांत 14 पॉईंट्स मिळवले आहेत.
IPL 2021, RR vs RCB : इंडियन प्रीमियर लीग सीझन 14च्या 43व्या सामन्यात आज विराटसेनेने राजस्थान रॉयल्सचा सात गडी राखून पराभव केला. दुबईच्या इंटरननॅशनल स्टेडिअममध्ये हा सामना खेळवण्यात आला. रॉयल चॅलेंजर्सचा हा या हंगामातील सातवा विजय आहे. आरसीबी 11 सामन्यांत 14 पॉईंट्स मिळवले आहेत.
राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 9 विकेट गमावत 149 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने 17.1 षटकात सामना जिंकला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून ग्लेन मॅक्सवेल 50 धावा केल्या. तर विकेटकीपर केएस भरत 44 धावा केल्या.
राजस्थानने दिलेल्या 150 धावाचे आव्हान करण्यासाठी उतरलेल्या बंगळूरुची सुरुवात चांगली झाली. देवदत्त पडिकल आणि विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी 5.2 षटकात 48 धावा केल्या. पडिक्कलने 17 बॉलमध्ये चार चौकारच्या मदतीने 22 धावा केल्या आहे. मुस्ताफिजुर रहमानने पडिक्कलची विकेट घेतली. त्यानंतर विराट कोहली आउट केले. विराटने 20 चेंडूमध्ये चार चौकारच्या मदतीने 25 धावा केल्या.
राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. राजस्थानला आतापर्यंत 11 पैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळाला आहे. आजचा सामना गमावल्याने राजस्थान रॉयल्सची प्लेऑफमध्ये सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे.
दोन्ही संघांचे संभाव्य संघ :
RCB Playing 11 : विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, श्रीकर भारत (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, शाहबाज अहमद, डेनियल क्रिश्चियन/ टिम डेविड, काइल जॅमीसन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज.
RR Playing 11: संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), एविन लुईस, यशस्वी जायसवाल, लियाम लिविंगस्टोन/डेविड मिलर, महिपाल लोमरोर, रियान पराग/शिवम दुबे, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन सकारिया, जयदेव उनादकट.