MI vs PBKS, Match Highlights : मुंबईची पंजाबवर 6 विकेटने मात
IPL 2021, MI vs PBKS : . पंजाबने फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये सहा विकेट गमावत 135 धावा केल्या.
IPL 2021, MI vs PBKS: मुंबई इंडियन्सने (MI) बुधवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2021) पंजाब किंग्स (PBKS) सहा गडी राखून पराभव केला. पंजाबने 136 धावांचे लक्ष्य मुंबईने 19 षटकात चार गडी गमावत पूर्ण केले आहे. हार्दिक पंड्याने दिलेल्या योगदानामुळे मुंबईने विजय मिळवला आहे.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाबने फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये सहा विकेट गमावत 135 धावा केल्या. मुंबईकडून कीरोन पोवार्ड आणि जसप्रीत बुमराह दोन विकेट घेतल्या तर क्रुणाल पांड्या आणि राहुल चाहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
पंजाबने 136 धावाचे लक्ष्य मुंबई 19 षटकात 4 विकेट गमवत पूर्ण केले. हार्दिक पंड्याने 30 बॉलमध्ये नाबाद 40 धावा केल्या. तर पोलार्ड 7 बॉलमध्ये नाबाद 15 धावा केल्या. मुंबईला 2 षटकात 16 धावांची आवश्यकता होती. पंड्याने 19 षटकात आव्हान पूर्ण केले. मुंबईकडून सौरभ तिवारीने सर्वाधिक 45 धावा केल्या आहेत .
त्याअगोदर आलेल्या पंजाबकडून केएल राहुल आणि मयंक अग्रवाल पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागिदारी केली. मनदीप सिंगने सलामी दिली. मनदीपने 15 धावा केल्या. मनदीपनंतर ख्रिस गेल मैदानात आला आहे. परंतु गेलला काही चांगली कामगिरी करता आली नाही. 50 धावांच्या आत पंजाबने चार फलंदाज गमावले. त्यानंतर एडन मार्कराम आणि दीपक हुडा यांनी संघासाठी धावा जमवल्या. 12 षटकात त्यांनी पंजाबला 4 बाद 75 अशी धावसंख्या गाठून दिली. पंजाबने 20 षटकात 6 बाद 134 धावा केल्या.