IPL 2020: प्ले ऑफ गाठण्यासाठी पंजाबला विजय आवश्यक, चेन्नईसाठी प्रतिष्ठेची लढत
CSK vs KXIP: आज आयपीएलच्या सुपर संडेमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेवन पंजाब भिडणार आहेत. पंजाबला प्ले ऑफ गाठण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकणं आवश्यक आहे तर चेन्नईला हा सामना जिंकून चांगला शेवट करण्याची संधी आहे.
CSK vs KXIP: आज आयपीएलच्या सुपर संडेमधील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स इलेवन पंजाब भिडणार आहेत. पंजाबला प्ले ऑफ गाठण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकणं आवश्यक आहे तर चेन्नईला हा सामना जिंकून चांगला शेवट करण्याची संधी आहे. मागच्या सामन्यात रविंद्र जाडेजाच्या शानदार खेळीने चेन्नईनं कोलकात्यावर रोमांचक विजय मिळवला होता. तर पंजाबला राजस्थानविरुध्द पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड भन्नाट फार्मात आहे. त्याने गेल्या दोन सामन्यात अर्धशतकं झळकावत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोबतच अंबाती रायडूदेखील फार्मात आहे. त्याला मोठी खेळी उभारता आली नसली तरी त्यानं आपलं सातत्य टिकवलं आहे. आयपीएलमधला यंदाचा चेन्नईचा हा शेवटचा सामना असणार आहे. त्यामुळं कर्णधार धोनीच्या खेळीकडेही सर्वाचे लक्ष असणार आहे. सैम कर्रन, दीपक चहर, शार्दुल ठाकूर या तिघांवर गोलंदाजीची मदार असेल. दुसरीकडे पंजाबकडे केएल राहुल, ख्रिस गेल,निकोलस पूरन हे भन्नाट फार्मात आहेत. गेलचं वादळ आज महत्वाच्या सामन्यात किती भारी पडणार हे पाहण्यासारखे आहे. मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी और अर्शदीप सिंह यांच्यावर गोलंदाजीची मदार असेल. पंजाबला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी आजचा सामना जिंकणं खूप गरजेचं आहे.
चेन्नई वगळता सर्व संघांना प्ले ऑफची संधी किंग्स इलेवन पंजाब, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइटरायडर्स आणि सनराइजर्स हैदराबाद या संघांनी 13 पैकी सहा सामने जिंकलेत तर सात सामने गमावले आहेत. मुंबई आधीच प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे तर चेन्नई बाहेर झाली आहे. आता चेन्नई वगळता सर्व संघांकडे प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची संधी आहे. असा असेल संघ चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड, शेन वॉटसन, अंबाती रायडू, एन जगदीसन, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), रविंद्र जडेजा, सैम कर्रन, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, मिशेल सेंटरन आणि लुंगी नगिदी. किंग्स इलेवन पंजाब- केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), मंदीप सिंह, क्रिस गेल, निकोलस पूरन, ग्लेन मैक्सवेल, दीपक हुड्डा, क्रिस जॉर्डन, मुरुगन अश्विन, रवि बिश्नोई, मोहम्म्द शमी और अर्शदीप सिंह.