IPL 2020 : मुंबईची परंपरा कायम, गेल्या आठ सिझनमध्ये सलामीच्या सामन्यात पराभव
IPL 2020 MI vs CSK: गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तेराव्या सीजनची विजयी सुरुवात केली.या पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं एक परंपरा मात्र कायम ठेवली. ती परंपरा म्हणजे सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची.
IPL 2020 MI vs CSK: गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तेराव्या सीजनची विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईने मुंबईवर पाच विकेट्ने मात केली. चेन्नईच्या विजयात अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिसने महत्त्वाची कामगिरी बजावली.
या पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं एक परंपरा मात्र कायम ठेवली. ती परंपरा म्हणजे सलामीच्या सामन्यात पराभूत होण्याची. गेल्या सलग आठ आयपीएल सिझनमध्ये मुंबईचा सलामीच्या सामन्यात पराभव झाला आहे.
2013 साली RCB विरोधात, 2014 साली KKR, 2015 साली पुन्हा KKR, 2016 साली RPS, 2017 साली पुन्हा RPS, 2018 साली CSK, 2019 साली DC तर यंदा काल झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा चेन्नईकडून पराभवाच्या सामना सलामीच्या लढतीत मुंबईला स्वीकारावा लागला आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीजनचं बिगूल काल यूएई मध्ये वाजला. याआधी 2014 साली जेव्हा यूएईमध्ये आयपीएल शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यावेळी मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली होती.
IPL 2020 MI vs CSK: गतविजेत्या मुंबईचा पराभव करत चेन्नईची विजयी सलामी
मुंबईचा यूएईमध्ये खराब रेकॉर्ड
कोरोना महामारीमुळे यंदा इंडियन प्रीमियर लीगचे आयोजन सयुंक्त अरब अमिरातमध्ये शिफ्ट करण्यात आले आहेत. आयपीएल भारताबाहेर खेळण्याची ही तिसरी वेळ आहे. 2009 लोकसभा निवडणुकीमुळे स्पर्धा दक्षिण अफ्रीकेत खेळवण्यात आली होती. तर 2014 मध्ये सुरुवातीचे सामने यूएई मध्ये खेळवण्यात आले होते. आयपीएल 2020 चा पूर्ण सीजन यूएई मधील दुबई, अबू धाबी आणि शारजाह शहरात होणार आहे.
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत यूएई मध्ये सहा सामने खेळले आहेत. या सहाही सामन्यात मुंबई इंडियन्सला हार पत्करावी लागली आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या तुलनेत चेन्नईच्या संघाला यूएईमध्ये चांगले यश मिळाले आहे. चेन्नई संघाने आतापर्यंत यूएई मध्ये खेळळ्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी चार सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसके संघाने आपला रेकॉर्डला कायम ठेवला आहे.
यूएईमध्ये मुंबई-चेन्नईचा पूर्वीही सामना यूएई मधील दुबईच्या मैदानावर दोन्ही संघामध्ये 2014 ला सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 20 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून 141 धावा काढल्या होत्या. बदल्यात चेन्नईच्या टीमने 19 ओवरमध्ये तीन गडी गमावून सामना आपल्या खिशात घातला होता. कालच्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्ससमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईच्या प्रभावी माऱ्यासमोर मुंबईला 9 बाद 162 धावांचीच मजल मारता आली होती. हे लक्ष्य अंबाती रायुडूच्या 71 तर फाफ डू प्लेसिसच्या 58 धावांमुळं चेन्नईनं चार चेंडू आणि पाच विकेट्स राखून पार केलं.