एक्स्प्लोर

IPL 2020 MI vs CSK: गतविजेत्या मुंबईचा पराभव करत चेन्नईची विजयी सलामी

चेन्नईच्या विजयात अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिसने विजयी कामगिरी केली. चेन्नईईची सुरुवात खराब झाली. अंबती रायडूने सीजनमधलं पहिलं अर्धशतक साजरं केलं.

IPL 2020 MI vs CSK: : गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तेराव्या सीजनची विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईने मुंबईवर पाच विकेट्ने मात केली. चेन्नईच्या विजयात अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिसने महत्त्वाची कामगिरी बजावली. चेन्नईची सुरुवात खराब झाली. मुरली विजय आणि शेन वॉटसन पहिल्या दोन षटकातच स्वस्तात माघारी फिरले.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या अंबाती रायडू आणि फाफ डू प्लेसिसने डाव सावरला. अंबाती रायडूने सर्वाधिक 71 धावा केल्या तर फाफ डू प्लेसिस 58 धावा करत त्याला साथ दिली. मुंबईकडून ट्रेंट बोल्ट, पॅटिनसन, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, राहुल चहर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

त्याआधी मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्ससमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. चेन्नईच्या प्रभावी माऱ्यासमोर मुंबईला 9 बाद 162 धावांचीच मजल मारता आली. वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि लुंगी एनगीडीनं सुरुवातीपासूनच मुंबईच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. एनगीडीनं तीन तर चहरनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं. रविंद्र जाडेजानंही दोन विकेट्स घेत त्यांना सुरेख साथ दिली. मुंबईकडून सौरभ तिवारीनं सर्वाधिक 43 धावा फटकावल्या. तर क्विंटन डी कॉकनं 33 धावांचं योगदान दिलं.

मुंबईचे ओपनर रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी फटकेबाजी करत वेगवान सुरुवात करुन दिली. मात्र पीयुष चावलाने रोहित शर्माला माघारी धाडलं. त्यानंतरच्या षटकात सॅम कर्रानने क्विंटन डी कॉकला माघारी धाडलं. त्यानंतर लुंगी एनगीडीनं तीन विकेट घेत मुंबईच्या धावसंख्येला ब्रेक लावला.

दीपक चहरचा अनोख विक्रम

आयपीएलच्या कारकिर्दीत दीपक चहर असा गोलंदाज बनला ज्याने सलग तीन सीजन आयपीएलमधील पहिला चेंडू टाकला. याआधी कोणत्याही गोलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. चहरने आयपीएल 2018 मध्ये मुंबईविरुद्ध सीजनमधील पहिला चेंडू टाकला. त्याच वेळी, आयपीएल 2019 मध्येही त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सीजनचा पहिला चेंडू टाकला आणि यंदा पुन्हा मुंबई विरुद्ध त्याने सीजनचा पहिला चेंडू टाकला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Bacchu Kadu Vs Navneet Rana : अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय?
अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय ?
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 23  April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडाBachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP MajhaBuldhana Rain Update : सोसाट्याच्या वाऱ्यासह बुलढाण्यात जोरदार पाऊस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bachchu Kadu : बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
बच्चू कडू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची, वादावादीत कोण-काय म्हणालं? वाचा सविस्तर...
Bachchu Kadu Amravati : पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
पोलिसांच्या पाया पडले, एकाला फटकावलं; बच्चू कडूंचा A टू Z राडा
Bacchu Kadu Vs Navneet Rana : अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय?
अमरावतीत सभास्थळावरून राणा-कडू वाद चिघळला, बच्चू कडूंनी थेट मैदानातच ठाण मांडलं; नेमकं प्रकरण काय ?
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Bachchu Kadu Amravati : अमरावतीत राडा, बच्चू कडू यांनी कुणाला मारलं? ABP Majha
Marathi Movie Bhushan Manjule : 'रील स्टार' चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून  झळकणार फ्रेश चेहरा; नागराज मंजुळेसोबत आहे खास कनेक्शन
'रील स्टार' चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून झळकणार फ्रेश चेहरा; नागराज मंजुळेसोबत आहे खास कनेक्शन
Unseasonal Rain : अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, शेतकरी संकटात
अवकाळीचं संकट कायम! मराठवाडा विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, शेतकरी संकटात
Bollywood Actress Tragic Death : सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीचा झाला करुण अंत; नवऱ्यानेच संपवलं; थरकाप उडवणारी गोष्ट
सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रीचा झाला करुण अंत; नवऱ्यानेच संपवलं; थरकाप उडवणारी गोष्ट
Anant Ambani - Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी - राधिका मर्चेंट 'या' ठिकाणी शाही थाटात अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
अनंत अंबानी - राधिका मर्चेंट 'या' ठिकाणी शाही थाटात अडकणार विवाहबंधनात; जाणून घ्या लग्नसोहळ्याबद्दल प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Embed widget