एक्स्प्लोर
#INDvsZIM: धोनी आज यंग ब्रिगेडसोबत उतरणार मैदानात

हरारेः झिम्बाब्वेच्या तीन एकदिवसीय मालिकेच्या दौऱ्यावर गेलेली टीम इंडीया आज पहिला सामना खेळणार आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनी नव्या दमाच्या खेळांडूंसह आज मैदानात उतरणार आहे. संघात असे पाच खेळाडू आहेत, ज्यांचा पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. धोनी 2005 नंतर पहिल्यांदाच झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे, त्यामुळे नवीन खेळाडू आणि मोठ्या कालावधीनंतरचा दौरा, यामुळे धोनीसमोर मोठं आव्हानं असणार आहे. टीम इंडीयाची यंग ब्रिगेड धोनी वगळता सध्याच्या संघामध्ये अंबाती रायडू आणि अक्षर पटेल हे दोनच असे खेळाडू आहेत, ज्यांच्याकडं आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. आयपीएलमध्ये जबरदस्त प्रदर्शन करणारा खेळाडू लोकेश राहुल याला पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आली आहे. तर यजुवेंद्र चाहल, करुण नायर आणि धवल कुलकर्णी यांनाही पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. संघाच्या गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह आणि धवल कुलकर्णी यांच्यावर असणार आहे. शिवाय धोनीकडे जयदेव उनादकांत हा देखील पर्याय आहे. तर फलंदाजीची धुरा लोकश राहुल, करुण नायर, मनीष पांडे, केदार जाधव या युवा खेळाडूंवर असणार आहे. या सहा खेळाडूंना पहिल्यांदाच संधीः
- लोकेश राहुल
- फेझ फैझल
- करुण नायर
- जयंत यादव
- यजुवेंद्र चाहल
- मनदिप सिंह
आणखी वाचा























