ज्युनिअर बुमराह मोदींच्या कडेवर, जसप्रीत आणि संजना गणेशनला पंतप्रधान काय म्हणाले?
Jasprit Bumrah With Son: वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी बुमराहची मैदानातील कृती ही प्रेक्षकांचं मन जिंकणारी होती. बुमराहने आपल्या विजयाचा आनंद पत्नी संजना गणेशन आणि मुलगा अंगदसोबत साजरा केला होता.
नवी दिल्ली : टी 20 विजेत्या टीम इंडियाने (Indian Cricket Team) आज पंतप्रधान मोदी (PM Modi) यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. पंतप्रधानांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी टीम इंडिया सकाळी 11 वाजता दाखल झाली. तिथे त्यांनी पंतप्रधान मोदींसह ब्रेकफास्ट केला आणि मोदींशी विविध विषयांवर संवाद साधला. पंतप्रधानांनी वर्ल्ड कप विजयातले अनेक किस्से त्यांच्याकडून जाणून घेतले. पंतप्रधान मोदींकडे क्रिकेटपटूंनी ही ट्रॉफी दिली. पंतप्रधानांनी विजेत्या टीमसह फोटोसेशनही केलं.त्याचे फोटो समोर येत आहे. या सर्व फोटोंमध्ये लक्ष वेधून घेतलय ते बुमराहच्या चिमुरड्याने....
संजना गणेशन आणि बुमराह यांच्या चिमुकल्याने विश्वचषकातील विजयानंतरही संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. बुमराह वेगवेगळे रेकॉर्ड करुन प्रेक्षकांचं मन जिंकलं. पण यासोबतच वर्ल्ड कप फायनलच्या दिवशी बुमराहची मैदानातील कृती ही प्रेक्षकांचं मन जिंकणारी होती. बुमराहने आपल्या विजयाचा आनंद पत्नी संजना गणेशन आणि मुलगा अंगदसोबत साजरा केला होता.
मेडल धावत जाऊन चिमुकल्याच्या गळ्यात
बुमराहने टी 20 वर्ल्ड कपच्या विजयाचा आनंद आपल्या खेळाडूंसोबत साजरा केलाच. पण त्याला मिळालेलं मेडल धावत जाऊन आपल्या चिमुकल्याच्या गळ्यात घातले. बुमराहाच्या या कृतीने त्याच्यातील बापमाणसाचे दर्शन झाले. बुमराह आणि संजनाचा मुलगा अंगद अवघा नऊ महिन्यांचा आहे. विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू या क्षणाला आपल्या कुटुंबियांना आठवत होतं. कारण हा आनंद प्रत्येकासाठी खास होता.
It was an honour to be invited to our honourable Prime Minister’s residence this morning. Thank you so much for your warmth and hospitality sir @narendramodi 🇮🇳 pic.twitter.com/xp8YBc3gD9
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) July 4, 2024
बुमराहने 'प्लेअर ऑफ द सीरीज' हा किताब पटकावला
भारतीय संघाने फायनलमध्ये साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवला आणि दुसऱ्या टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी आपल्या नावावरुन केली. भारताने टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकून इतिहास रचला. फायनलमध्ये बुमराहने 2 विकेट घेतल्या तर बुमराहने 'प्लेअर ऑफ द सीरीज' हा किताब पटकावला.
हे ही वाचा :
PM Narendra Modi Team India: टीम इंडियाची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?; फोटो अन् कॅप्शनने वेधलं लक्ष