PM Narendra Modi Team India: टीम इंडियाची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?; फोटो अन् कॅप्शनने वेधलं लक्ष
PM Narendra Modi Team India: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाच्या खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली.
PM Narendra Modi Team India: टीम इंडियाने (Indian Cricket Team) आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. या भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी टीम इंडियासाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली.
नरेंद्र मोदींनी एक्स हँडलद्वारे (आधीचे ट्विटर) दोन फोटो शेअर केले. यावेळी नरेंद्र मोदींनी टीम इंडियासाठी लिहिले की, "चॅम्पियन्ससोबत छान भेट झाली" 7, लोककल्याण मार्ग येथे विश्वचषक विजेत्या संघाचे स्वागत करण्यात आले. यादरम्यान संस्मरणीय गोष्टी घडल्या, असं नरेंद्र मोदी म्हणाले. टीम इंडियाच्या खेळाडूंना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. याबाबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.
An excellent meeting with our Champions!
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2024
Hosted the World Cup winning team at 7, LKM and had a memorable conversation on their experiences through the tournament. pic.twitter.com/roqhyQRTnn
नरेंद्र मोदींना 1 नंबरची जर्सी भेट-
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्ना आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाची जर्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिली. या जर्सीचा क्रमांक 1 होता आणि त्यावर नमो असे लिहिले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
The triumphant Indian Cricket Team met with the Honourable Prime Minister of India, Shri Narendra Modiji, at his official residence today upon arrival.
— BCCI (@BCCI) July 4, 2024
Sir, we extend our heartfelt gratitude to you for your inspiring words and the invaluable support you have provided to… pic.twitter.com/9muKYmUVkU
टीम इंडिया मुंबईसाठी रवाना-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर सर्व खेळाडू दिल्ली विमानतळावर दाखल झाले. मुंबईसाठी रवाना होण्यासाठी टीम इंडिया दिल्ली विमानतळावर दाखल झाली आहे. भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर आज भारताच्या टी-20 विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.
टीम इंडियाचे चार खेळाडू थेट विधानभवनात
सध्या मुंबईत महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान भारतीय संघांचे मुंबईतील खेळाडू रोहित शर्मा, शिवम दुबे, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची उद्या (5 जून रोजी) भेट घेणार आहे. यावेळी विधीमंडळाच्या सभागृहात या खेळाडूंचा खास सत्कार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आज माहिती दिली. यासंबंधीचे निमंत्रण या खेळाडूंना देण्यात आलं आहे . यावेळी सर्व पक्षाचे आमदार उपस्थित रहावे यासाठी विधानसभा अध्यक्षांकडे विनंती करणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
टीम इंडिया विमानतळापासून हॉटेलमध्ये पोहचेपर्यंत...काय काय घडलं?; पाहा A टू Z माहिती
गळ्यात विजयी मेडल...विराट कोहलीने दिल्ली विमानतळाबाहेर येताच काय केलं?; पाहा Video
हार्दिक पांड्याच्या मागची विघ्नं संपता संपेना; पुन्हा संशायाची पाल चुकचुकली, नेमंक काय घडलं?