Ind vs Jpn, Asia Cup Hockey : आशिया कपमध्ये भारतासमोर पुन्हा जपानचं आव्हान, यावेळी तरी विजय मिळणार का? कधी, कुठे पाहाल सामना?
IND vs JPN Asia Cup Hockey 2022 Live Streaming : हॉकी आशिया कपमध्ये इंडोनेशियाला 16-0 च्या तगड्या फरकाने मात दिल्यानंतर आज भारत सुपर 4 मध्ये जपानचा सामना करेल.
India vs Japan Asia Cup Hockey 2022 : हॉकी आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अगदी एखाद्या फिल्मच्या स्क्रिप्टसारखी आहे. आधी सलामीचा सामना पाकिस्तानविरुद्ध अनिर्णीत सुटल्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताला जपान संघाने 5-2 च्या फरकाने दारुण मात दिली. ज्यानंतर भारताने तिसऱ्या सामन्यात इंडोनेशियाविरुद्ध 16-0 च्या फरकाने मोठा विजय मिळवत अखेर सुपर 4 फेरी गाठली आहे. पण आता मात्र भारतासमोर जपानचं आव्हान असणार असून जपानने नुकताच भारताला 5-2 ने मात दिल्याने आज भारताला चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे.
या स्पर्धेत दोन पूल होते. ज्यात पूल ए मध्ये भारत आणि पाकिस्तानसोबत जपान आणि यजमान संघ इंडोनेशिया देखील आहे. तर दुसरीकडे पूल बीमध्ये मलेशिया, कोरिया, ओमान आणि बांग्लादेश हे संघ होते. दरम्यान पहिल्या सामन्यात भारताने सुरुवातीपासून एका गोलची आघाडीू कायम ठेवली होती. पण अखेरच्या काही मिनिटांत पाककडून गोल करण्यात आल्याने सामना अनिर्णीत ठरला. तर दुसऱ्या सामन्यात मात्र जपानने सुरुवातीपासून आपला दबदबा ठेवला होता. भारताने महत्त्वपूर्ण दोन गोल केले पण तोवर जपानने आघाडी वाढवल्याने अखेर भारत 5-2 ने पराभूत झाला. त्यानंतर आज भारताने 16-0 च्या मोठ्या फरकाने विजय मिळवत पुढील फेरी गाठली आहे. तर जपानने भारत आणि पाकिस्तानला मात देत पुढील फेरी गाठली आहे. दरम्यान आता जपान आणि भारत आमने-सामने असतील.
कधी आहे सामना?
शनिवारी अर्थात 28 मे रोजी भारत आणि जपान हॉकी संघामध्ये हा सामना पार पडत आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या गेलोरा, बुंग कार्नो स्टेडियम कॉम्पलेक्समध्ये खेळवला जाणार आहे.
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत आणि जपान यांच्यातील हॉकी मॅच भारतीय वेळेनुसार 5 वाजता सुरु होणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
भारत आणि जपान यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल.
हे देखील वाचा-