IND vs ENG 2nd ODI, LIVE : भारत- इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना, पाहा सामन्याचे प्रत्येक अपडेट
India vs England 2nd ODI Score LIVE Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जात आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे

Background
India vs England 2nd OD I: भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी दीड वाजता सुरु होईल. तीन सामन्यांच्या या मालिकेत पहिला सामना जिंकून भारतानं 1-0 अशी आघाडी घेतलेली आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारल्यास भारताला इंग्लंडविरुद्ध क्लीन स्वीप नोंदवण्याची संधी मिळेल.
श्रेयस अय्यर खांद्याला दुखापत झाल्याने वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. आता श्रेयसच्या जागेवर कोणाला संधी मिळणार यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. टी-२० मध्ये चमकलेला सूर्यकुमार यादवला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कर्णधार इयॉन मॉर्गनला दुखापत झाल्याने वन डे मालिकेतून बाहेर झाला आहे. आता मॉर्गनच्या जागेवर विकेटकीपर जोस बटलर संघाचे नेतृत्त्व करणार आहेत. तर सॅम बिलिंग्स देखील दुखापतीमुळे दुसरा वनडे सामना खेळणार नाही. या दोन्ही खेळाडूंना पहिल्या वन डे सामन्या दरम्यान इजा झाली होती.
इयॉन मॉर्गनच्या जागेवर डेविड मलानला संधी मिळण्याची शक्यात आहे. मलान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची अधिक शक्यता आहे. तर सॅम बिलिंग्सच्या जागेवर लियाम लिविंगस्टोनला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.
इंग्लंडचे 4 खेळाडू माघारी
स्टोक्स माघारी परतल्यानंतर इंग्लंडनं आणखी दोन खेळाडूही गमावले. त्यामुळं संघाची फलंदाजी काहीशी गडगडली सध्या संघाची धावसंख्या 38 व्या षटकामध्ये 4 गडी बाद 293 धावा
99 धावांवर स्टोक्स बाद
बेन स्टोक्स 99 धावा करुन शतकापासून अवघी एक धाव मागं असताना तंबूत परतला. 52 चेंडूंमध्ये त्यानं 99 धावांची खेळी खेळत भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणलं होतं. या खेळीत त्यानं 10 षटकार आणि 4 चौकार लगावले.























