India vs England 1st ODI Highlights | पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत विजयी; इंग्लंडचा 66 धावांनी पराभव
पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाने इंग्लंडचा 66 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशा फरकानं आघाडी मिळवली आहे.
India vs England 1st ODI Highlights इंग्लंडच्या संघाविरोधात सुरु असणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याच्या पहिल्या सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. पाहुण्या इंग्लंडच्या संघाला यजमानांनी 66 धावानू पराभूत करत मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.
महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं इंग्लंडपुढे 318 धावांचं आव्हान ठेवलं. हे आव्हान स्वीकारत इंग्लंडचा संघ मैदानात आला. सलामीच्या जोडीनं केलेली दमदार सुरुवात पाहता सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांवर काहीसं दडपणही आलं. पण, दोन गडी बाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव कोलमडताना दिसला.
अखेरीस 43 व्या षटकाची सुरुवात व्हायला आणि इंग्लंडचा अखेरचा खेळाडू तंबूत परतायला एकच वेळ. 318 धावा करण्यासाठी मैदानात उरलेल्या इंग्लंडचे सर्व खेळाडू 251 या धावसंख्येवर तंबूत परतले. त्यामुळं आता पाहुण्या संघाच्या अडचणी वाढल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध कृष्ण या युवा खेळाडूनं पदार्पणाच्याच सामन्यात 54 धावा देत 4 गडी बाद करण्याची किमया केली.
Virat Kohli To Open for RCB: आयपीएल 2021 मध्ये ओपनिंग करणार, विराटची माहिती
प्रसिद्धच्या प्रदर्शनामुळं त्याच्या पाठीवर संघातील खेळाडूंनी कौतुकाची थाप दिली. इंग्लंडच्या तीनं जॉ़नी बेअरस्टोनं सर्वाधिक 94 धावा केल्या. इतर सर्वच खेळाडूंना प्रभावी कामगिरी करता आली नाही. तिथून भारतीय गोलंदाजांच्या फळीतून प्रसिद्ध कृष्णा (4 गडी), शार्दुल ठाकूर (3 गडी), भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्या (प्रत्येकी 1 गडी) या खेळाडूंनी इंग्लंडच्या संघावर गोलंदाजीचा मारा केला.
Superb bowling display by #TeamIndia 🇮🇳 after 🏴 got off to a rollicking start 💥💥
— BCCI (@BCCI) March 23, 2021
India win by 6️⃣6️⃣ runs and take a 1-0 lead in the 3-match ODI series #INDvENG @Paytm
Scorecard 👉 https://t.co/MiuL1livUt pic.twitter.com/0m58T6SdKq
भारतीय फलंदाजीही गाजली.
भारतीय खेळाडूंनी फलंदाजीमध्येही चांगलं प्रदर्शन केलं. शिखर धवन यानं 98 धावा केल्या. तर राहुलनं 62 आणि कृणाल पांड्यानं 58 धावा केल्या. विराट कोहलीनं 56 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं. कृणाल आणि के.एल. या दोघांनीही सहाव्या विकेटसाठी 112 धावांची बिनबाद भागिदारी रचत संघाची धावसंख्या 300 च्याही पलीकडे पोहोचवली.