एक्स्प्लोर
Advertisement
धवन-विजयचं शतक, शेवटच्या सत्रात अफगाणिस्तानचं पुनरागमन
शिखर धवनपाठोपाठ त्याचा सलामीचा साथीदार मुरली विजयनेही अफगाणिस्तानविरुद्धच्या बंगळुरु कसोटीत शतक साजरं केलं.
बंगळुरु: शिखर धवनपाठोपाठ त्याचा सलामीचा साथीदार मुरली विजयनेही अफगाणिस्तानविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत शतक साजरं केलं. त्यामुळं या कसोटीत भारताच्या डावाला आणखी मजबुती मिळाली.
मुरली विजयचं कसोटी कारकीर्दीतलं हे बारावं शतक ठरलं. त्याने 143 चेंडूत 15 चौकारा आणि एका षटकाराच्या सहाय्याने शतक पूर्ण केलं. दुसरीकडे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या के एल राहुलनेही अर्धशतक पूर्ण केलं.
त्याआधी शिखर धवननं या कसोटीत पहिल्याच दिवशी उपाहाराआधी शतक झळकावण्याचा पराक्रम गाजवला. पहिल्या दिवशीच उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन हा जगातील सहावा, तर पहिलाच भारतीय फलंदाज ठरला. धवनने अवघ्या 87 चेंडूत शतक झळकावलं. त्याच्या शतकाला 18 चौकार आणि तीन खणखणीत षटकारांचा साज होता.
उपहारापूर्वी खेळ थांबला त्यावेळी भारताने 27 षटकात बिनबाद 158 धावा केल्या होत्या. मुरली विजय 72 चेंडूत नाबाद 41 तर शिखर धवन 91 चेंडूत 104 धावांवर खेळत होता.
दरम्यान, उपहाराननंतर शिखर धवन 96 चेंडूत 107 धावा करुन माघारी परतला.
या कसोटीत कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सलामीवीर धवन आणि मुरली विजयने सार्थ ठरवला. धवनने आधी 47 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मग त्याने धावगती वाढवत अवघ्या 87 चेंडूत शतक पूर्ण केलं.
उपहारापूर्वी शतक झळकावणारा धवन पहिलाच भारतीय फलंदाज तर जगातील सहावा फलंदाज ठरला.
उपहारापूर्वी शतक झळकावणारे फलंदाज
व्हिक्टर ट्रम्पर (ऑस्ट्रेलिया)
चार्ल्स मॅकार्टनी (ऑस्ट्रेलिया)
डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)
माजिद खान (पाकिस्तान)
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
शिखर धवन (भारत)
क्रिकेटचा नवा अध्याय
बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आज कसोटी क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला जात आहे. असगर स्टॅनिकझाईचा अफगाणिस्तान संघ अजिंक्य रहाणेच्या टीम इंडियाशी खेळून कसोटी क्रिकेटमधलं आपलं पदार्पण साजरं केलं.
भारत आणि अफगाणिस्तान संघांमधल्या या एकमेव कसोटीला आजपासून चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरुवात झाली आहे.
अफगाणिस्ताननं वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये आपली क्षमता सिद्ध केली असली, तरी कसोटी क्रिकेटच्या मैदानात भारत-अफगाणिस्तान लढाई ही विषम ताकदीची लढाई ठरावी.
आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया नंबर वन आहे, तर युद्धग्रस्त अफगाणिस्तान कसोटी क्रिकेटच्या दुनियेत सुरुवातीची पावलं टाकत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा अफगाणिस्तान हा 12 वा देश आहे.
आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असेल. राशिदसह मुजीब जादरान आणि मोहम्मद शहजाद हे खेळाडूही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सज्ज आहेत.
दरम्यान, भारताचा नियमित कर्णधार विराट कोहलीसह मुख्य गोलंदाजी अस्त्र भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह या कसोटीत खेळणार नाहीत. अफगाणिस्तानसाठी हा कसोटी सामना खास आहे. या सामना पाहण्यासाठी अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुल्ला भारतात आले आहेत.
... म्हणून भारतीय संघात रोहित शर्माऐवजी करुण नायरला संधी
भारताचे क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड हे सुद्धा मैदानात उपस्थित राहणार आहेत. अफगाणिस्तानने 2001 मध्ये ICC मध्ये सहभागी झाल्यानंतर, भारताकडून अफगाणिस्तानच्या क्रिकेट विकासाला मदत केली आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातले राजकीय आणि खेळातील संबंध अत्यंत चांगले आणि जुने आहेत. अफगाणिस्तानचा पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध होईल, अशी घोषणा स्वतः बीसीसीआयने पुढाकार घेत डिसेंबर 2017 मध्ये केली होती.
आयर्लंडसोबत अफगाणिस्तानने जून 2016 मध्ये कसोटी खेळण्यासाठी मान्यता मिळवली आहे. उभय देशांचे क्रिकेट बोर्ड आयसीसीचे पूर्णवेळ सदस्यही बनले आहेत. अफगाणिस्तानने गेल्या काही दिवसांपासून टी-20 आणि वन डेत शानदार प्रदर्शन केलं आहे.
भारतीय संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, रिद्धीमान साहा, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा, शार्दूल ठाकूर
संबंधित बातम्या
राशिद खानच्या भारतीय नागरिकत्वाबाबत सुषमांचं ट्विट, अफगाणिस्तानचे अध्यक्ष म्हणतात..
रशीद खानचं विकेट्सचं वेगवान शतक
वन डे संघात स्थान न मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणतो...
सिद्धार्थ कौलला संधी, तीन मालिकांसाठी भारतीय संघ जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement