एक्स्प्लोर
LIVE: पावसामुळे दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्राचा खेळ रद्द

कानपूर: केन विल्यमसन आणि टॉम लॅथमच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कानपूर कसोटीत न्यूझीलंडनं भारताला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडनं आतापर्यंत एक बाद 152 धावांपर्यंत मजल मारली आहे.
- कानपूर कसोटीत दुसऱ्या दिवसाचा तिसऱ्या सत्राचा खेळ पावसामुळं रद्द, न्यूझीलंडची 1 बाद 152 धावांची मजल, विल्यमसन 65, लॅथम 56 धावा
विल्यमसन 65 धावांवर तर टॉम लॅथम 56 धावांवर खेळत आहे. याआधी न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिलला उमेश यादवनं 25 धावांवर माघारी धाडलं.
- कानपूर कसोटीत न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि टॉम लॅथमची अर्धशतकं, न्यूझीलंड एक बाद 135 धावा
कानपूर कसोटीतील दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा पहिला डाव 318 धावांवर आटोपला. या डावात भारताकडून मुरली विजयनं सर्वाधिक 65 धावा केल्या. ग्रीनपार्कवर न्यूझीलंडच्या अचूक माऱ्यासमोर भारताची पहिल्या दिवसअखेर अवस्था 9 बाद 291 अशी बिकट झाली होती.
- न्यूझीलंडला पहिला धक्का, मार्टीन गप्टील बाद, उमेश यादवनं घेतला बळी
- भारताचा पहिला डाव 318 धावांवर आटोपला, मुरली विजयच्या सर्वाधिक 65 धावा
सामन्यावर पकड मजबूत होत असतानाच काही खेळाडूंनी खराब शॉट खेळून विकेट टाकल्याचं सलमीवर मुरली विजयचं म्हणणं आहे.
'मी ज्या फटक्यावर बाद झालो तो देखील खराब फटका होता. त्यावर मला काम करायचं आहे. ही खेळपट्टी पाहता हा स्कोअर चांगला आहे. पण आता आम्हाला न्यूझीलंडवर दबाव टाकणं गरजेचं आहे.' असंही विजय म्हणाला.
खरं तर या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया उपाहाराला 1 बाद 105 अशा भक्कम स्थितीत होती. पण त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात न्यूझीलंडच्या गोलंदाजांचंच वर्चस्व पाहायला मिळालं. भारताकडून मुरली विजयनं सर्वाधिक 65 धावांची आणि चेतेश्वर पुजारानं 62 धावांची खेळी केली. त्या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी रचली. तर रविचंद्रन अश्विननं 40 धावांची खेळी केली.
भारताचे बाकीचे फलंदाज मात्र मोठी खेळी करू शकले नाहीत. रोहित शर्मा 35 धावांवर तर अजिंक्य रहाणे 18 धावांवर माघारी परतला. विराट कोहली 9 धावांवर असताना नील वॅगनरच्या बाऊन्सरवर त्यानं आपली विकेट गमावली. तर रिद्धिमान साहाला भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा रवींद्र जाडेजा 11 धावांवर तर उमेश यादव आठ धावांवर खेळत होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
राजकारण
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
