IND vs ENG 2nd Test LIVE Cricket Score Updates: तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडपुढची संकटं वाढली, तीन खेळाडू तंबूत माघारी
IND vs ENG 2nd Test LIVE Cricket Score Updates: भारत आणि इंग्लंडदरम्यानचा हा दुसरा कसोटी सामना आहे. चार सामन्यांच्या मालिकेत पहिली कसोटी जिंकत इंग्लंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
LIVE
Background
IND vs ENG 2nd Test LIVE Cricket Score Updates: चेन्नईतल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतानं या कसोटीसाठी अक्षर पटेल आणि कुलदीप यादवला संधी दिली आहे. शाहबाज नदीमऐवजी अक्षर, तर वॉशिंग्टन सुंदरऐवजी कुलदीप खेळेल. तसंच जसप्रीत बुमराला विश्रांती देऊन मोहम्मद सिराजला खेळवण्यात येत आहे.
इंग्लंडच्या संघातून डॉम बॅस, जेम्स अॅन्डरसन, जोफ्रा आर्चर आणि जोस बटलर या खेळाडूंना संघातून बाहेर ठेवण्यात आलं असून हे चार खेळाडू दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाहीत. इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पाच नव्या खेळाडूंचा समावेश केला आहे. मोईन अली, बेन फोक्स आणि स्टुअर्ट ब्रॉड हे खेळाडू दुसरा कसोटी सामना खेळणार आहेत. क्रिस व्होक्स आणि ओली स्टोन या दोन खेळाडूंमधील एक खेळाडू अंतिम अकरा जणांत खेळणार आहे.
या आधी झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 227 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
IND vs ENG : T20 सीरिजसाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा; 'हा' धडाकेबाज खेळाडू संघाबाहेर
डॉम बॅस, जेम्स अॅन्डरसन आणि जोस बटलर या तीन खेळाडूंना संघाने विश्रांती देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. तर जोफ्रा आर्चर हा जखमी असल्याने संघाच्या बाहेर आहे. जोस बटलर या पुढचे तीनही सामने खेळू शकणार नाही कारण तो इंग्लंडला परत गेला आहे. बेन फोक्स आता इंग्लंडच्या संघामध्ये विकेट कीपिंगचे काम करणार आहे.