Rohit Sharma : दुसऱ्या कसोटीत हिटमॅन रोहित शर्मा धोनीचा विक्रम मोडण्यापासून अवघे दोन पाऊल दूर!
भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये 90 षटकार मारले आहेत. या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Rohit Sharma : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) इंग्लंडविरुद्धच्या (Ind vs Eng 2nd Test) कसोटी मालिकेत अनोखा विक्रम करण्याच्या जवळ आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 590 षटकार ठोकले आहेत. या मालिकेत रोहित शर्मा आणखी 10 षटकार मारण्यात यशस्वी ठरला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा तो जगातील पहिला खेळाडू बनेल. इतकंच नाही तर धोनी आणि सेहवागचे रेकॉर्ड तोडण्यावरही रोहित शर्माचा डोळा आहे. दुसऱ्या कसोटीत रोहित शर्मा धोनीचा विक्रम मोडू शकतो, तर उर्वरित 4 सामन्यांमध्ये तो टीम इंडियाचा कर्णधार वीरेंद्र सेहवागला सहज पराभूत करू शकतो.
Rohit Sharma vs James Anderson in the 2021 Test series:
— Johns. (@CricCrazyJohns) February 1, 2024
Runs - 82
Balls - 291
Fours - 8
Average - 82
Out - 1 pic.twitter.com/kfhBpkS7lB
भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये 90 षटकार मारले आहेत. या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये 78 षटकार मारले आहेत. 55 कसोटी खेळून रोहित शर्मा धोनीचा विक्रम मोडण्यापासून दोन पावले दूर आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 77 षटकार ठोकले आहेत. दुसऱ्या कसोटीतच आणखी दोन षटकार मारून हिटमॅन धोनीचा विक्रम सहज मोडेल.
Rohit Sharma scored 176 and 127 in the last Test match India played at the Vizag.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 1, 2024
- The Hitman show at Vizag...!!! 💥 pic.twitter.com/Ub0ppXStCK
रोहित शर्मा सिक्सर किंग
रोहित शर्मा सध्या क्रिकेट जगतातील सिक्सर किंग आहे. रोहित शर्मा ज्या सहजतेने चेंडू सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी पाठवतो, ते सध्याच्या घडीला अन्य कोणत्याही फलंदाजात दिसत नाही. रोहित शर्माने 262 एकदिवसीय सामने खेळताना 323 षटकार ठोकले आहेत. रोहित शर्माची बॅट T20 क्रिकेटमध्येही खूप प्रभावी आहे आणि त्याने 151 सामने खेळताना 190 षटकार ठोकले आहेत. चौकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्माही मागे नाही आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माने 1700 हून अधिक चौकार मारले आहेत. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 18 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
Aakash Chopra said "Rohit Sharma is such an opening batsman who plays an innings in Test cricket & single handedly takes the match to such a position from where you cannot lose the match". [Aakash Chopra YT] pic.twitter.com/Ro0dr1wEso
— Johns. (@CricCrazyJohns) February 1, 2024
इतर महत्वाच्या बातम्या